तामिळनाडूमध्ये घडला धक्कादायक प्रकार (फोटो -सोशल मिडिया)
तामिळनाडूमध्ये घडला धक्कादायक प्रकार
हॉस्टेलच्या विद्यार्थ्याला निर्वस्त्र फिरवले
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
Tamilnadu Crime: तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तामिळनाडूच्या तिरूमंगलम येथे असलेल्या एका कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला चप्पलने मारहाण देखील करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये नेमक काय घडले आहे, ते जाणून घेऊयात.
तमिळनाडू राज्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आलं आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याला निर्वस्त्र करून त्याला संपूर्ण हॉस्टेलमध्ये फिरवले आहे. या विद्यार्थ्याला चप्पलने देखील मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी तक्रार दिल्यानंतर तीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत कॉलेज प्रशासनाने हॉस्टेल वॉर्डनला निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी एका सहकारी विद्यार्थ्याचे कपडे उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. तसेच पीडित विद्यार्थ्याला चप्पलने मारहाण केली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे ओरडणे ऐकू येत आहे. यांबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतो. आरोपी विद्यार्थ्यानी रॅगिंग करण्याच्या उद्देशाने त्याचसोबत अमानवीय व्यवहार केला आहे. पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या [प्रकरणाची गंभीर दखल घेत कॉलेज प्रशासनाने हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत वॉर्डनचे निलंबन कायम असणार आहे.
फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार
भंडाऱ्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री करणं एका तरुणीला खूपच महागात पडलं आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना
भंडारा जिल्ह्यातील २२ वर्षीय पीडित तरुणी हिची आरोपी तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. आरोपी आणि पीडित हे भंडारा शहरालगत असलेल्या एका गावातील आहेत. आरोपी तरुण हे दोघेही मित्र असून त्यांनी पीडितेला देसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यांनतर २० सप्टेंबरला आरोपींनी तिला भेटायला बोलावले. आरोपींनी पीडितेला गुंगीचं औषध दिलं. यांनतर तिला तिच्या घरी पोहोचवून देण्याच्या बहाण्याने गावालगत असलेल्या कॅनल मार्गावरील निर्जनस्थळी नेत एकानं बळजबरीनं अत्याचार केला. त्यानंतर दुसर्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला.