जिल्हा परिषद निवडणूक 2026
खेडमध्ये 53 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात
अनेक उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
लोटे व धामणादवापस गणातन ‘हे’ उमेदवार निवडणूक रिंगणात
खेड: तालुक्यात होणाऱ्या ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती निवडणुकांसाठी रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची नावे अंतिम झाली असून सात जिल्हा परिषद जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत तर १४ पंचायत समिती जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जि. प. सुकीवली गटातून उबाठाचे रामचंद्र बाबू आखाडे व शिवसेनेचे सचिन धाडवे यांच्यात सरळ लढत होत आहे.
कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विनायक निकम व भाजपाच्या दिव्या होळकर या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. भरणे जि. प. गटातून उबाठाच्या सुहासिनी चिंचघरकर व शिवसेनेच्या मानसी महेश जगदाळे यांच्यात सरळ लवत होत आहे, कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोशनी साळवींनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भडगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर व शिवसेनेचे रवींद्र रेवाळे निवडणूक रिंगणात आहेत.
दयाळ ते भरणे पंस गणामध्ये होणार तिरंगी, पंचरंगी लढत
दयाळ जि. प. गटातून शिवसेनेचे अरुण उर्फ अण्णा कदम उबाठाचे अजिंक्य देवेंद्र मोरे, बसपाचे चंद्रसेन मोहिते, अपक्ष इनायतुल्ला अब्दुल रहिमान व अपक्ष विजय महादेव राक्षे यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे. विराधीवाडी जिला परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजली खापरे, उबठाच्या स्पृहा चांदीचते व शिवसेनेच्या रेवती पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे, लोटे जि, परिषद गटातून भाजपाच्या मनाली कांबळी, शिवसेनेच्या आदिती खाडे व उबाठाच्या अंकिता रहेलकर यांच्यात तिरंगी लढत तर धामणदेवी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या जाई आहे, राष्ट्रवादीच्या सानिका आआंग्रे आणि उबाठाच्या पित्ती मनवळ यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सुकीवली पं. स. गणातून शिवसेनेच्या सुनिता कासार, उबठाच्या सुनिता गोमले भाजपाच्या दिव्या होळकर वाच्यात तिरंगी लढत होणार आहे तर भरणे प. स. गणातून बसपाचे मिलिंद गमरे, शिवसेनेचे प्रशांत वव्हाण, भाजपाचे विजय दरेकर, उबाठाचे सचिन निकम व मनसेचे प्रशांत मडलिक संध्यात पंचरंगी लढत होणार आहे.
Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
लोटे ते धामणदिवी पंस गणातून ‘हे’ उमेदवार निवडणूक रिंगणात
लोटे गणातून भाजपाचे अविनाश आंबे, शिवसेनेचे जीवन आंग्रे, उबाटाचे अजय चाळके, अपक्ष नितीन कडू व अपक्ष विपुल तांबे यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे तर आंबहस गणातून उबाठाच्या अमिता बने, भाजपाच्या मेचना मोरे, शिवसेनेच्या सीमा सकपाळ आणि अपक्ष दिपाली हुमणे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. अंजनी गणातून शिवसेनेच्या अफिया पालेकर, राष्ट्रवादीच्या आकांक्षा मोरे आणि वंचितच्या अभिलाषा जाधव यांच्यात पंचरंगी लढत होत आहे. तर धामणदिवी गणातून राष्ट्रवादीच्या समृद्धी तेजस गोठल, उबाठाच्या रेवती घाग आणि शिवसेनेच्या नंदिनी पवार यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.






