रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई (फोटो- istockphoto )
पोलिस अधीक्षक बगाटे यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ जाळले
१८१ किलो अमलीपदार्थ करण्यात आले नष्ट
जनतेकडूनही पोलिसांना सहकार्याची अपेक्षा|
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आहे गेल्या काही वर्षापासून अमली पदार्थांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात इक्ला आहे. त्यामुळे तरुण पिढी चे मोठे नुकसान होत आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या २०२० ते २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेले सुमारे १८१ किलो एवढे विविध अमलीपदार्थ न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे येथील रांजणगाव येथे जाळून नष्ट केले. एनडीपीएस ऍक्ट १९८५ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात २०२० ते २०२५ या कालावधीमध्ये अमली पदाथांच्या संदर्भातील एकूण ६५ एनडीपीएस गुन्हे दाखल झाले होते.
या गुन्ह्यामध्ये तब्बल १८१ किलो अमलीपदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी जप्त केलेल्या हा अमली पदार्थाचा ऐवज नष्ट करण्याचे आदेश सर्वच जिल्ह्याच्या पोलिस दलाना दिले होते. त्यानुसार पुणे येथील रांजणगाव येथे न्यायालयाच्या प्राप्त आदेशानुसार हे अमली पदार्थ शुक्रवारी जाळून नष्ट करण्यात आले आहेत.
Ahilyanagar News: सुकेवाडीत पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, तस्कर मात्र फरार
महासंचालकांच्या निर्देशानंतर रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर या समितीमध्ये सदस्य म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक श्री बी महामुनी तसेच मुख्यालय पोलिस उपअधीक्षक राधिका फडके या आहेत.
जनतेकडूनही पोलिसांना सहकार्याची अपेक्षा
रत्नागिरी जिल्हा ड्रग्स डिस्पोजल समितीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने ६५ गुन्ह्यांमधील १८२ किलो १४१ ग्राम आणि १०५ मिलीग्राम अमली पदार्थ जाळून नष्ट केला. जाळलेल्या अमली पदार्थांमध्ये ८२ किलो ९८१ ग्राम ७५ मिलीग्राम गांजा, ९७ किलो ८९९ ग्राम चरस, २५२ ग्रॅम ३० मिलीग्राम ब्राऊन हेरॉईन, नऊ ग्रॅम एमडी या अमली पदार्थ्यांचा समावेश होता. जिल्ह्यात अद्यापही अमली पदार्थाचे रॅकेट मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे पोलिसांकडून है रॅकेट तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी विविध मोहिमाही राबविण्यात येत आहेत. या मोहिमांमध्ये यश मिळवण्यासाठी जनतेकडूनही पोलिसांना सहकार्याची अपेक्षा आहे.






