सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ९ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. हि घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची मंद्रूप पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी संध्याकाळी ५च्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावाच्या पोलीस पाटलांना गावात एका मुलीचा मृतदेह खड्यात पुरण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पाटील आणि प्रशासनाने घटनास्थळी जातं पाहणी केली होती. त्यावेळी घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात एका मुलीचा मृतदेह पुरून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर माहिती समोर येणार आहे. या प्रकरणी नातेवाईकांची चौकशी करण्यात येतं असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या की नैसर्गिक मृत्यू हे स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
मुलीचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या?
रुग्णालयाच्या अहवालत मुलीचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या केली हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जाईल अशी माहिती मंद्रूप पोलिसांनी दिली आहे. 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसात खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कधी घडली? यामध्ये कोण कोण सामील आहे? याबाबतची माहिती घेतली जात आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
आणखी दोन लाख रुपये दे, नाहीतर…; नामांकित बिल्डरला लाखो रुपयांना घातला गंडा