प्रयागराजनमध्ये ड्रायव्हरची हत्या (फोटो- सोशल मिडिया)
प्रयागराजमध्ये ड्रायव्हरची हत्या
कुटुंबाने हायवे जाम करत केली वाहनांची तोडफोड
दगड आणि वीटा मारून केली चालकाची हत्या
Murder News: उत्तर प्रदेशच्या प्रयागरायजमध्ये एक भयानक घटना घडली आहे. क्षुल्लक भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने दगड आणि विटा यांच्या मदतीने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. प्रयागरायजमधील धूमनगंज पोलिस स्टेशन परिसरातील टोल प्लाझा येथील पेट्रोल पंपावर किरकोळ वाद झाल्याने एक व्यक्तीची हत्या झाली आहे.
पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून रोडवेज ड्रायव्हरची दगड विटा मारून हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाले आहे. यानंतर हत्या झालेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबांनी संपूर्ण हायवेच जाम केला. तसेच काही गाड्यांची तोडफोड देखील केली.
निमसाय येथे राहणारे रावेंद्र नावाचे व्यक्ती रोडवेजमध्ये ड्रायव्हर होते. ते आपल्या काही कामानिमित पेट्रोल पंपाच्या जवळ गेले होते. तिथे त्यांची काही लोकांसोबत काही कारणाने वादावादी झाली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. तेथील लोकांनी रावेंद्रला दगड आणि विटा यांनी मरण करण्यास सुरुवात केली. यामध्ये रावेंद्र हे जखमी झाले.
स्थानिक लोकांनी आरडा ओरड केल्यावर आरोपी त्या जागेवरून पळून गेले. त्या ठिकाणी रावेंद्र यांना ततिडणे उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. ड्रायव्हरच्या कुटुंबाने पोलिसांकडे आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी कारवाई करण्याची मागणी करत प्रयागराज-कानपूर हायवे जाम केला.
पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला
उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जारवाल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील नरपतपुरवा गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरात पुरल्याची घटना समोर आली. सहा फूट खोल खोदकाम केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी पती हरिकिशन फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र घटनेचे गुपित उघडताच उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला. नेमकं काय आहे प्रकरण?
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) रामानंद प्रसाद कुशवाह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, नरपतपुरवा गावातील रहिवासी ४५ वर्षीय फुला देवीच्या पालकांनी १३ ऑक्टोबर रोजी तिच्यासाठी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान असे आढळून आले की फुलाचा पती हरिकिशन, जो हरियाणातील एका कारखान्यात काम करतो, तो तिच्या बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी घरी परतला होता. पोलिसांना हरिकिशनच्या खोलीत ओली माती दिसली, ज्यामुळे संशय निर्माण झाला. यानंतर, त्यांनी खोदकाम सुरू केले. एएसपीने सांगितले की खोदकाम करताना कुजणे दिसू लागले आणि आणखी खोदकाम केल्यानंतर, फूला देवीचा मृतदेह सापडला.