सासू आणि जावयाचं नातं पवित्र असत. सासू जावयाच्या नात्यात परस्पराबद्दल सन्मान, आदराची भावना असते. पण सासू जावयाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे घडली आहे. ही घटना मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेने गावातील नागरिकांना धक्का बसला आहे.
दुचाकीस्वार चोरट्यांनी दाम्पत्याला लुटले; अंगावरील दागिने काढायला सांगितले अन्…
नेमकं घडलं काय?
७ ऑगस्टच्या सकाळी कोलाला गावाजवळ काही लोक रस्त्यावरुन चालले होते. तिथे एक प्लास्टिक बॅग पडल्याचं त्यांच्या नजरेस आलं. संशय आला म्हणून त्यांनी बॅग उघडली. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. बॅगमध्ये मानवी शरीराचे तुकडे होते. हे तुकडे सापडल्याने लोक घाबरले. तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आसपास शोध घेतला तेव्हा दुसऱ्या दिवशी सात बॅग सापडल्या. त्यात मानवी शरीराचे भाग आणि महिलेचं शीर मिळालं.
महिलेच्या शिराच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. तो मृतदेह 42 वर्षीय लक्ष्मी देवीचा मृतदेह असल्याचे समोर आले. एवढेच नाहीत तर टोच्या मृतदेहाचे १९ तुकडे केले होते. एक ऐकून गावातील लोक सुन्न झाले. या संतापजनक आणि खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक के. वी यांनी एक विशेष टीम बनवली.
पोलिसांनी काही दिवस तपास केल्यानंतर तीन आरोपींना अटक केली. तर तो दुसरं तिसर कोणी नसून त्या महिलेच्या मुलीचा नवरा म्हणजेच जावई आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मी देवीच्या आरोपी जावयाचे नाव रामचंद्रप्पा एस असे असून त्याचे दोन साथीदार सतीश के. एन. आणि किरण के असे त्याच्या दोन साथीदाराचे नाव आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. जावई हा पेशाने डॉक्टर आहे. तिघेही तुमकुरुचे राहणारे आहेत.
हत्या करण्याचे कारण काय?
पोलीस चौकशीत या हत्येमागचं कारण समोर आला आहे. आरोपी जावई हा आपल्या सासूच्या चारित्र्यावर संशय घेत होता. लक्ष्मी देवीच्या कृत्यांमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय असं जावयाचं मत होतं. हाच संशय आणि रागापोटी रामचंद्रप्पाने मित्रांसोबत मिळून सासूच्या हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन ते वेगवेगळ्या बॅगेत भरले. पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
धक्कादायक ! केकमध्ये आढळल्या अळ्या, नागरिक संतापले; पोलिसांनी बेकरी केली सील