अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पाटोडे यांचा मुलावर चाकूने वार करण्यात आले आहे. हल्ला झालेल्या मुलाचे नाव यश पातोडे असे आहे. त्याच्यावर ७ वार करण्यात आले. यात यश पातोडे हा गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पातोडे समर्थकांनी आरोपीचे वाहन जाळले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या
नेमकं काय घडलं?
आरोपी सूरज आत्माराम इंगोले (वय 31) याने यश पातोडे (वय 24) याच्या घरात शिरून त्याच्यावर चाकूने 5 ते 7 वेळा वार केले. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून शुक्रवारी दुपारी घडली आहे.
या घटनेची माहिती शहरात पसरताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पातोडे समर्थक आक्रमक झाले. संतप्त जमावाने आरोपी सुरज इंगोलेंच्या घरासमोर उभी असलेली ओमनी चारचाकी गाडी फोडून पेटवून दिली. त्यांनी आरोपी इंगोले याच्या घरावरही हल्ला केला. या हल्ल्यात सूरज इंगोले देखील जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
५००० कोटी रुपयांच्याड्रग्सचा भांडाफोड, मीरा भाईंदर पोलिसांची हैदराबादमध्ये मोठी कारवाई
वसई विरार पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी हैदराबाद येथील ड्रग्स फॅक्टरीवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन सामोर आले. दरम्यान, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांना सोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्स किंमत 5000 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई शुक्रवारी (5 सप्टेंबर 2025) ला करण्यात आली.
या छापेमारीत एमडी ड्रग्ससह त्यासाठी लागणारे इतर केमिकल व ड्रग बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखाना मालकास पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. रचकोंडा येथील चेरलापल्ली एमआयडीसीमध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी हा मोठा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला. तेलंगणातील ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 5000 कोटी आहे.
Pune Crime: आयुष कोमकर हत्या प्रकरण! ‘चुकीला माफी नाही’ पुणे पोलिसांनी आरोपींना दिला इशारा