sucide ( फोटो सौजन्य - social media )
धाटाव, रोहा तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून, आजीने आपल्या १ वर्षाच्या नातवासह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. उर्मिला कोरे (५१) असे मृत महिलेचे नाव असून, तिने नातू वेदांत भोगडे (१) याला घेऊन इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. या घटनेत वर्षाच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचीही महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक प्राणज्योत मावळली.
हवामान बदलाचा विमान सेवेला फटका; फेब्रुवारीत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21 टक्क्यांवर
बुधवारी रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान आजीने नातू वेदांत विवेक भोगडेला सोबत घेऊन ओम चेंबर बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली. त्यामुळे आजीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे आजीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृत उर्मिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
आला नातवाच्या दीर्घ आजारपणाचा कंटाळा
उर्मिला कोरे यांनी नातवाच्या दीर्घ आजारपणाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. टोकाचे पाऊल का उचलले? त्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, उर्मिला कोरे या गेल्या काही दिवसांपासून तणावग्रस्त दिसत होत्या. त्यांचा नातू गंभीर आजाराने त्रस्त होता, त्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
रोहा परिसरात शोककळा
आजी-नातवाच्या मृत्यूच्या या घटनेमुळे रोहा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी उर्मिला यांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या जबाबाची नोंद घेतली जात आहे.