शेतीच्या वादातून महिलेवर कोयत्याने वार; लाथाबुक्क्यांसह डोळ्यात मिरचीपूडही भिरकावली (संग्रहित फोटो)
शिक्रापूर : राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, मारामाऱ्या यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर यांचे पती नितीन उर्फ अण्णा कुसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशन शिवाजी नप्ते (वय ४४, रा. नप्तेवस्ती, करंदी) हे आपल्या ‘शिवदरबार पान शॉप’मध्ये काम करत होते. यावेळी नितीन कुसेकर, सचिन कुसेकर, रवींद्र उर्फ पांडा जगताप आणि एक अनोळखी तरुण कारमधून येऊन त्यांनी चार पान घेतली. यानंतर नप्ते याने पैसे मागितल्यावर “गावात आमची दहशत आहे, तु पण दोन हजार रुपये हप्ता दे” अशी धमकी देत, दुकानदाराला ओढून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किसन नप्ते यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नितीन कुसेकर, सचिन कुसेकर, रवींद्र जगताप आणि अनोळखी तरुण यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करीत आहेत.