निर्दयी मुलाचे भंयकर कृत्य! 'कुटुंब नियोजन का केलं नाही?'वडिलांची दगडाने ठेचून हत्या (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव : बाप आणि मुलाचं नातं हे प्रेम, आदर, मार्गदर्शन आणि आधार यावर आधारित एक खूप सुंदर आणि घट्ट नातं आहे. जिथे वडील मुलासाठी पहिला आदर्श (hero) आणि मार्गदर्शक असतात आणि मुलगा वडिलांना आपला मित्र आणि मार्गदर्शक मानतो, त्यांच्यातील हे नातं अनेकदा अबोल असूनही खूप भावनिक असते. हे नातं अनेक कथा, चित्रपट आणि कवितांमधून व्यक्त होतं. मात्र धाराशिवमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया न करता दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या सख्ख्या बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
धुळप्पा महिपती सुरवसे (रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आरोपी मुलाचे नाव असून, त्याने शुक्रवारी१६ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५:३०च्या सुमारास अणदुर शिवारातील चिकणी तांडा परिसरातील शेतात आपले वडील महिपती आंबाजी सुरवसे (४५ वर्षे, रा. मानेवाडी) यांचा दगड डोक्यात घालून जिवे ठार मारल्याचा आरोप आहे.
दुसरे लग्न केले होते. मात्र, त्याची पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले नव्हते. या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत होता. याच वादातून संतप्त झालेल्या आरोपीने शेतात वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मृताची आई लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे (७० वर्षे, रा. मानेवाडी) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
गुरुवारी सायंकाळी महिपती सुरवसे हे अणदुर शिवारातील शेतात काम करत असताना आरोपी धुळप्पा त्या ठिकाणी पोहोचला. तिथे पुन्हा त्याच कारणावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात धुळप्पाने रागावरचा ताबा सोडला आणि जवळच असलेला एक मोठा दगड डोक्यात घातला. दरम्यान, याप्रकरणी सध्या नळदुर्ग पोलीस आरोपीचा शोध घेत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एका शुल्लक घरगुती वादातून ही हत्या झाल्याने मानेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.






