दोन रिक्षा चालकांकडून ट्रॅफिक वार्डनला मारहाण (फोटो- istockphoto)
पिंपरी: वाहतूक पोलिसांनी रिक्षावर दंड मारला म्हणून दोन रिक्षा चालकांनी मिळून पोलिसांसोबत असलेल्या ट्रॅफिक वार्डनाला लाकडी बांबूने मारहाण केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
मलींद भाईदास पिंपळे (32, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनचे नाव आहे. सुमित ऊर्फ सुम्या आणि सुभाष ऊर्फ सुभ्या (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे भोसरी येथील पुलाखालून चालले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज देऊन थांबविले. रिक्षा चालक सुमित ऊर्फ सुम्या याच्या रिक्षावर फिर्यादी यांनी पोलिसांना १० हजार रुपयांचा दंड मारायला लावला असा समज आरोपींचा झाला. आता दंड तूच वसूल करुन मला दे, असे म्हणत फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने दोघांनीही मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत दोन गट भिडले
चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या; हरसिमरत रंधावासोबत नक्की काय घडलं?
गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.