शेतकऱ्याची 11 लाखांची फसवणूक (फोटो -istockphoto)
शिक्रापूर: मांडवगण फराटा ता. शिरुर येथील प्रदीप वरळे यांचा शेतीसह कारखान्याला ऊस तोडून देण्याचा व्यवसाय असून प्रदीप यांना ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल अकरा लाख पन्नास हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. या घटनेनंतर शिरुर पोलीस स्टेशन येथे पवन पवार व भगवान धनसिंग राठोड या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मांडवगण फराटा ता. शिरुर येथील प्रदीप वरळे यांचा शेतीसह कारखान्यांना ऊस तोड करुन पुरवण्याचा ठेका आहे. ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाण हून ऊस तोड कामगार आणत असल्याने त्यांच्या व्यवसायातून त्यांची पवन पवार व भगवान राठोड या इसमांसोबत ओळख झाली. दरम्यान पवन व भगवान यांनी प्रदीप यांना ऊसतोड कामगार देतो असे सांगून कामगारांना उचल म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी करुन अकरा लाख पन्नास हजार रुपये घेतले.
मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने प्रदीप यांनी दोघांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे प्रदीप यांच्या निदर्शनास आल्याने प्रदीप गुलाबराव वरळे वय ३८ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पवन पवार रा. मुदखेड ता. जामनेर जि. जळगाव व भगवान धनसिंग राठोड रा. निंभोरी तांडा ता. जामनेर जि. जळगाव या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल गवळी हे करत आहे.
शिक्रापूरमधून समोर आली हृदयद्रावक घटना
शिरुर येहील युवतीची ओळख अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले.
Shikrapur Crime: लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार अन्…; शिक्रापूरमधून समोर आली हृदयद्रावक घटना
त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत पुन्हा युवतीला कोरेगाव भीमा येथील मित्राच्या रूमवर घेऊन जाऊन युवतीवर बलात्कार केला. याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय कैलास साळुंखे रा. कोपरगाव ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील महिला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.