नेमकं प्रकरण काय?
बागपत येथील रहिवासी रियासत याचा विवाह सैन हिच्याशी झाला होता. सैनच्या आयुष्यात आधीच एक पुरुष होता, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती. त्याच नाव समीर असे आहे. रियासतसोबत लग्न झाल्यानंतर सुद्धा तीच प्रेमसंबंध सुरु होते. याची भनक सैनचा पती रियासातला लागली. नंतर त्याने वारंवार विरोध करायला सुरुवात केली. याचा राग समीरला आला आणि याच रागातून त्याने सैनसमोर पती रियासतची हत्या केली.
यापूर्वी दिली होती धमकी…
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीरने याआधी देखील रियासतला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच रात्री तो आपली प्रेयसी सैनला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा सैनचा पती रियासत आणि प्रियकर समीर या दोघांमध्ये मोठा वाद उफळला. रियासतने इथं का आला आहे, असा जाब विचारला होता. त्यानं घरी येऊ नये असे समीरला सांगितले. याच वादाचं रूपांतर मारहाणीत झाला. समीरने मारहाणीत रियासतवर वारंवार वार केले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पुरावे गोळा केले जात असून गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. मृत रियासतचा भाऊ अबलूचा आरोप आहे की सैनने समीरसह त्याच्यावरही चाकूने हल्ला केला होता. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
Ans: रियासतला पत्नी सैनचे प्रियकर समीरसोबतचे संबंध मान्य नव्हते. त्यावरून झालेल्या वादात समीरने त्याची हत्या केली.
Ans: रियासतच्या भावाचा आरोप आहे की सैननेही समीरसोबत मिळून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
Ans: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि गुन्हा नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.






