उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या केवळ एका वर्षानंतर महिलेचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर आरोपीने त्या महिलेचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी (२८ ऑक्टोबर) ला नवाबंगजच्या ओम सिटी कॉलनीमध्ये अनिता नावाच्या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. मृत महिलेचा पती ट्रॅक्टर चालक असल्याचं सांगण्यात येत आहे. संध्याकाळच्या दरम्यान आरोपी अनिल त्याच्या घरी पोहोचल्यानंतर, दरवाज्याला कुलूप असल्याचं त्याने पहिले. त्यावेळी, त्याने आसपासच्या लोकांकडे अनिताबद्दल विचारपूस केली. पत्नीबाबत कोणतीच माहिती त्याला मिळाली नसल्याने पती कुलूप तोडून घरात घुसला आणि त्यावेळी त्याला खोलीत अनीतचा मृतदेह दिसला. तिची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
चोरीची घटना दाखवण्यात आली मात्र…
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, पोलीस बघताच घरातील सामान सुद्धा अस्ता-व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. खरं तर, ही एक चोरीची घटना असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तपास केला घरातून कोणतंच सामान गायब नसल्याचं आढळून आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिताच्या माहेरच्या लोकांनी तिचा पती, सासू, सासरे, दीर या सासरच्या लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घरच्यांनी काय दिली माहिती
अनिल आणि अनिताचे लग्न वर्षभरापूर्वी झालं होत असं पीडितेच्या भावाने सांगितले. त्याने पुढे सांगितलं की, लग्नात १४ लाख रुपये खर्च करून सुद्धा अनिताच्या सासरची मंडळी समाधानी नव्हती. अनीता ही त्याचा पती अनिल आणि दिरासोबत ओम सिटी कॉलनीमध्ये राहत होती. लग्नानंतर, सासरचे लोक तिच्यावर माहेरकडून कार आणण्यासाठी दबाव आणायचे. यानंतर, पीडित महिलेने तिच्या सासरच्या लोकांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला सासरच्यांनी घरातून बाहेर काढलं. दोन्ही कुटुंबीयांनी चर्चा झाल्यानंतर ती पुन्हा तिच्या सासरी गेली. मंगळवारी सकाळी अनिलने पीडितेच्या आईला फोन करून अनिता घरी नसल्याचं सांगितलं. ती माहेरच्या घरी सुद्धा गेली नसल्याने तो थेट घरी पोहोचला आणि त्यानंतर त्याला खोलीत अनीताचा मृतदेह आढळला.
नशेच औषध देऊन गळा चिरून हत्या
आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मारहाणीची कोणतीच चिन्हे नसल्याने पीडितेला नशेचं औषध देऊन तिची गळा चिरून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.






