Raigad News Politically Motivated Man Breaks Car Window Complaint Filed Against Unknown Person At Revdanda Police Station
Raigad News : राजकीय सुडबुध्दीने कारची काच फोडली; रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात तक्रार दाखल
आगामी जि.प. व पं.स. निवडणूकीची अलिबाग तालुक्यातील चौलमध्ये जोरदार तयारी दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर रेवदंडामध्ये चक्क भर दिवसा अज्ञातांनी राजकीय सुडबुध्दीतून चारचाकीची चाक फोडल्याची घटना घडली आहे.
रेवदंडा/महेंद्र खैरे : राज्यात आता निवडणूकीचे वारे वाहत आहेत याचपार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोपांप्रमाणेच साम दाम दंड भेद या मार्गांचा आवलंब करणं हे काही जनतेना आणि राज्याच्या राजकारणाला काही नवं नाही. निवडणूका जस जशा जवळ येत आहेत तसं अनेक संवदनशील घटना घडत असताना दिसून येत आहे. रेवदंडामध्ये चक्क भर दिवसा अज्ञातांनी राजकीय सुडबुध्दीतून चारचाकीची चाक फोडल्याची घटना घडली आहे.
आगामी जि.प. व पं.स. निवडणूकीची अलिबाग तालुक्यातील चौलमध्ये जोरदार तयारी दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर सोशल मिडियावरुन ऐकमेकांच्या विरोधात चिखलफेक केला जात आहे. निवडणूक उमेदवाराचा प्रचाराचे वारे सुसाट सुटले असतानाच, राजकीय सुडबुध्दीत राडाबाजीचा गंध सुध्दा सुटल्याने चौल शितळादेवी येथे भर दिवसा पार्किगला उभी असलेली इनोव्हा कारच्या मागच्या बाजूची काच फोडण्यात आली, असून या विरोधात रेवदंडा पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
चौल शितळादेवी येथे प्रतिक गुरव यांची एम.एच.01/88/8348 क्रमांकांची इनोव्हा कार पार्किग केली होती, या पार्किग इनोव्हा कारची दि. 29 ऑक्टोबर 2025 चे दिवशी सकाळी 10.00 ते सायकांली 5.30 चे दरम्यान भर दिवसा कोणीतरी अज्ञात इसमाने दारूची रिकामी बाटली फेकून पाठीमागील काच फोडली व इनोव्हा कारचे नुकसान केले, अशी तक्रार रेवदंडा पोलिस ठाणे येथे प्रतिक गुरव यांनी नोंदविली आहे. हे राजकीय सुडबुद्धीने केलं अससल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शितळादेवी येथील रहिवाशी प्रतिक गुरव हे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार सचिन राउळ यांचे मेव्हणे आहेत. गेले काही दिवस सचिन राउळ यांचे प्रचारार्थ सोशल मिडियाव्दारे प्रतिक गुरव यांनी प्रचाराची रणधुमाळी सांभाळली आहे. विशेषतः चौल चौल ते आग्राव रस्ता नुतनीकरणाबाबत विरोधकाच्या हल्लाबोलात ताबडतोब प्रतिउत्तरे दिली होती. शिवाय प्रतिक गुरव हे जि.प.संभाव्य उमेदवार सचिन राउळ यांचे मेव्हणे असल्याने राजकीय सुडापोटी शितळादेवी मंदिर परिसरात पार्किग इनोव्हा कारची मागील काच अज्ञाताने दारूची बाटली फेकून फोडली असे प्रतिक गुरव यांचे म्हणणे आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांनी अज्ञाताचे विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. यावेळी चौल मधील शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने रेवदंडा पोलिस ठाणे येथे उपस्थित राहिले होते.
एकदंरीत चौल मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे बिगुल वाजले असून निवडणूकीच्या प्रचाराची धुळ जोरदार उडत आहे. महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे वतीने जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार म्हणून नागावचे सचिन राउळ यांचे नाव निश्चित झाले आहे. गेल्या आमदार व खासदार निवडणूकीत महायुतीने चौल मध्ये भरघोस मताची आघाडी घेतली होती, त्यामुळे महायुती व शिवसेना शिंदे गटात उत्साहाचे वातावरण असून पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी निवडणूकीत पुनस्यः परिश्रम करण्यास सज्ज झाले आहे.
Web Title: Raigad news politically motivated man breaks car window complaint filed against unknown person at revdanda police station