समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
यवतमाळ : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरलेला आहे. याठिकाणी शाहीस्नान करण्यासाठी भाविक जात आहेत. त्यानुसार, धाराशिव येथील एक कुटुंब प्रयागराजला गेले होते. तेथून परत येत असताना यवतमाळच्या आर्णी तालुक्यात या परिवाराच्या कारला अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
हेदेखील वाचा : Wikipedia: छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त माहितीमुळे, विकीपीडियाच्या संपादकांवर होणार FIR दाखल
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुकळीजवळ हा अपघात झाला. यात चिखली धाडेश्वर (जि. धाराशिव) येथील विमल बालचंद्र महामुने (वय ६७) यांचा जागीच मृत्यू झाला. विमल महामुने या आपल्या परिवारासोबत धाराशिव येथून प्रयागराजला महाकुंभमेळ्यात गेली होती. कुंभमेळ्यातून परत आर्णी मार्गे धाराशिवकडे जात असताना आर्णी तालुक्यातील सुकळीजवळ यवतमाळवरून माहूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला कारने जबर धडक दिली.
यात कारमधील ६७ वर्षीय महिला ही जागीच ठार झाली. तर त्याचा ३५ वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारची टँकरला जोरदार धडक
प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची ओघ सुरू आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या महाकुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे भाविक आता मोठ्या संख्येने प्रयागराजला जात आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील महामुने परिवार प्रयागराजला गेला होता. त्याठिकाणाहून परतताना त्यांच्या कारने समोर जाणाऱ्या टँकरला मागून जबर धडक दिल्याने हा अपघात झाला.
टँकरची कारला धडक
दुसरीकडे, सासवड रस्त्यावर फुरसुंगी येथील पावर हाऊसजवळ एक भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत कारचालक तरूणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.
महिला पोलिसाला कारने उडवले
दरम्यान, गेल्या काही दिवसाखाली ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ च्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेदेखील वाचा : Weather Forecast: राज्यात कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा…! 48 तास महत्त्वाचे, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान