राज्यात कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा...! 48 तास महत्त्वाचे, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान राज्यात कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा...! 48 तास महत्त्वाचे, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Weather Forecast in Marathi: राज्यातच नाही तर संपूर्ण देशात हवामानाता बदल होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा आहे पण बंगालच्या उपसागराच्या चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. पुढील तीन दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे इत्यादी शहरांमध्ये तापमान वाढले आहे. त्याचबरोबर विदर्भातही तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील अनेक भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हवामानात बदल दिसून येत आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी वाढत आहे. राज्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान वाढत आहे. गुरुवारी सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईतील कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचू शकते.
Thunderstorms with Lightning, Hail and Gusty winds (40-60 Kmph) during afternoon/evening hours over North Odisha, South Jharkhand and Gangetic West Bengal tomorrow (22nd February, 2025)#imd #WeatherUpdate #weatherforecast #jharkhand #WestBengal #odisha #Thunderstorm #Lightning… pic.twitter.com/DzWZUwGfa3
— India Meteorological Department (@Indiametdept) February 21, 2025
गुरुवारी मुंबईत कुलाबा येथे कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस होते, तर सांताक्रूझमध्ये ३४.१ अंश सेल्सिअस होते. मुंबईतील किमान तापमान २० अंशांच्या पुढे गेले आहे. कोकणातील सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदवले गेले. आठवड्याच्या अखेरीस मुंबईतील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचू शकते. यानंतरही तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान नोंदवले जाऊ शकते.
राज्यातील उर्वरित भागात, सोलापूरमध्ये सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांगलीमध्येही ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील काही केंद्रांवर कमाल तापमान १५ ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमान वाढत आहे, तर किमान तापमान कमी होत आहे. ज्यामुळे दोन्ही तापमानांमधील फरक त्रासदायक ठरत आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले, तर किमान तापमान १९ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान होते. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे कमाल तापमान ३६ अंशांपेक्षा जास्त नोंदले गेले.
चक्रीवादळ वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांसाठी अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू शकत नाहीत, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे निरभ्र आकाश असूनही, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात कोणतीही थंडी पडलेली नाही. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हवेचा दाब आणि हवेच्या अभिसरण प्रणालीत बदल झाला तरच थंडी जाणवेल, अन्यथा राज्यात थंडी जाणवणार नाही, असेही त्यांनी सांगितले.