एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…
हनीमून नाईटला नवरा थकतो!
या दोघांचा विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता. ११ एप्रिल २०२५ ला या दोघांनी लग्न केल होत. पत्नीला पहिल्या दिवसापासून यावर संशय होता. हनिमून नाइटला तो “खूप थकलो आहे” असे सांगत झोपी गेला. तो शारीरिक संबंधांपासून दूर पळायचा. बायकोच्या लक्षात आल्यावर तिने त्याला उपचार घ्यायला सांगितला, मात्र त्याने आधी दाखवलं आहे अस तो सांगत होता. काही दिवस तो नैसर्गिक पुढाकार घेईल अस बायकोला वाटल. मात्र त्यात काही बदल झाला नाही. हा प्रकार दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू होता.
हे बाहेर कुणाला सांगू नको
तिने सासरी तक्रार दिली मात्र सासरच्या लोकांनी तिला उलट धमक्या दिल्या. ‘हे बाहेर कुणाला सांगू नको’ असे तिला सांगण्यात आले. माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता “लग्न झालंय, निभावून न्यायचं” अशी सक्ती करण्यात आली. बायकोकडून होणाऱ्या सततच्या मागणीला नवरा कंटाळला. पत्नीला त्याने शारीरिक त्रास देणे, मानसिक त्रास देणे सुरू ठेवलं आणि एके दिवशी “चल तुला दाखवतो” म्हणत तिच्या नको त्या जागेवर तसेच मांडीवर सिगारेटची चटके दिले.
चुलत सासऱ्याची वाईट नजर
नणंदांनी माहेरी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पत्नी जिमला जावी म्हणून तिच्याकडून 60 हजार रुपये आणून घेतल्याचा आरोपही तिने केला आहे. एवढेच नाही तर पतीने चुलत सासऱ्यांना तिच्याकडे पाठविले. त्यांनीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले त्यानंतर तिने त्यांचा घरात प्रवेश नाकारला. यानंतर तिच्यावर शिवीगाळ आणि मारहाण देखील झाले असे तक्रारीत नमूद करण्यात आले.
कुटुंबात त्याने दिली कबुली
दोन कुटुंबात वाद विकोपला गेल्यावर बैठक बसली. या बैठकीत त्याने मी लैंगिकदृष्ट सक्षम नसल्याचं सांगितलं. पत्नीने घरच्या लोकांना सांगून पण दुर्लक्ष केल गेल. जर पतीने आधीच कबुली दिली असती तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे अशा एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. नवरा बायकोच नात आनंददायी राहील पाहिजे यासाठी संवाद आवश्यक आहे.
Ans: पत्नीने शारीरिक संबंधांवर आग्रह धरणे आणि नवरा वारंवार टाळणे यावरून वाद वाढला.
Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि प्रकरण तपासात आहे.
Ans: लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे मान्य केले, तरीही अत्याचार सुरूच असल्याचे सांगण्यात आले.






