'अमेरिका मुर्दाबाद'! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबाराने पेटला हिंसाचार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Middle East War : मध्यपूर्वेत हाहाकार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला ‘महाभयंकर प्लॅन’
पाकिस्तान(Pakistan) मध्ये खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिमांनी शांततापूर्ण आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र पाकिस्तानी लष्कराने शिया आंदोलकांवर केलेल्या गोळीबारामुळे याला हिंसक वळण मिळाले आहे. या गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. म शहरात हे आंदोलन सुरु होते. मात्र गोळीबारानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये हिंसक भडका उडाला आहे. लष्कराच्या गोळीबारात अनेक लोका मारले गेले असून शेकडो जखमी झाले आहेत. या क्रूर कारवाईमुळे शिया मुस्लिमांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
लष्कराच्या गोळीबारानंतर संतप्त जमावाने स्कार्दू ब्रिगेड कमांडरच्या निवासस्थानावर आणि नॉर्दर्न लाईच इन्फंट्रीच्या कार्यलयांवर धावा केला आहे. इमारतींना आग लावण्यात आली आहे. तसेच लष्करी शाला आणि लष्करी निवासस्थानांवर हल्ले करण्यात आले आहेत. पोलिस अधीकक्षक कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा अमेरिका(America)-इस्रायल(Israel) च्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळे जगभरातील शिया मुस्लिमांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानमधील १५ टक्के शिया मुस्लिम लोक रस्त्यावर उतरले असून अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये आंदोलने सुरु आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानमधील हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नागरिकांना तातडीचा इशारा जारी केला आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’
Ans: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांमध्ये दु:खाचे वातावरण असून अमेरिका-इस्रायलच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे.
Ans: पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दू शहरात शिया आंदोलकांवर लष्कराने गोळीबार केला आहे.






