उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दागिने आणि दीड लाख रुपयांसाठी एका 45 वर्षीय शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाच्या हत्येला अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एका व्हिडीओ कारणीभूत ठरला आहे.
हुंड्यासाठी विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न; पतीने गळा दाबला अन्…
मीडिया रिपोर्टनुसार, हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव इंद्र कुमार तिवारी आहे. अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एका व्हायरल व्हिडीओमुळे त्याची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याच गावातील रहिवासी मृतक इंद्र कुमार आहे.
काय घडलं नेमकं?
मे २०२५मध्ये अनिरुद्धाचार्य यांनी जबलपूरमधील रीमझा गावात कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला इंद्र कुमारही उपस्थित होता.
त्यांनतर यावेळी त्याने अनिरुद्धाचार्य यांच्याकडे त्याची व्यथा मांडली होती. “माझ्याकडे 18 एक्कर जमीन आहे, पण माझे लग्न होत नाही” असं त्याने सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा व्हिडीओ बघूनच साहिबा बानो उर्फ खुशी तिवारी आणि तिचा साथीदार कौशल गौड यांनी इंद्र कुमार तिवारीशी संपर्क केला. साहिबा बानोने त्याला विवाहासाठी प्रस्ताव पाठवला. पुढे १७ में रोजी कौशलने इंद्रकुमारशी संपर्क साधत गोरखपूर येथे बोलवलं. इंद्र कुमारचा विश्वास बसावा यासाठी तिने खुशी तिवारी नावाने फेसबूक खातेही उघडले. बनावट आयडीद्वारे तिने इंद्रकुमारला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
त्यांनतर २ जून रोजी इंद्रकुमारशी कुटुंबाच्या विरोधानंतरही दीड लाख आणि दागिने घेऊन घर सोडले आणि ३ जून रोजी तो गोरखपुरात पोहोचला.गौरखपूरमध्ये कौशल आणि साहिबा यांची भेट झाली. त्यावेळी कौशलने स्वतःला खुशीचा भाऊ असल्याचं सांगितलं. ५ जून रोजी एका मंदिरात इंद्रकुमार आणि खुशी यांनी विवाह केला. मात्र सुहागरातच्या रात्री कौशल आणि साहिबाने मिळून इंद्रकुमारवर चाकूने हल्ला केला. यावेळी त्याच्यापोटात आणि गळ्यावर वार करण्यात आले. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह कुशीनगरच्या हाटा कोतवाली परिसरातील एका शेतशिवारात फेकला. यावेळी साहिबा आणि कौशने इंद्र कुमार जवळील दागिने आणि 1.5 लाख रुपये लंपास केले.
आणि हत्येनंतर कुणाल संशय येऊ नये म्हणून साहिबाने तीन दिवस त्याच्या कुटुंबाशी संपर्क ठेवला. मात्र, काही केल्या पाच ते सहा दिवसांपासून इंद्रकुमारशी संपर्क होत नसल्याने पोलिसात तक्रार दिली. त्यांनतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि संपूर्ण घटना उघडकीस आली. याप्रकरणी आता पोलिसांनी महिलसह दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.