येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी जवळपास सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची जोरदार चर्चा आहे. मनसेने 100 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे त्यांना किती जागांवर विजय मिळेल, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यातच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही ठिकाणी पाठिंबा देण्याचेही जाहीर केल्याचे सांगितले जात आहे.
हेदेखील वाचा : CM Eknath Shinde : ‘मी डॉक्टर नाही, पण मोठं ऑपरेश केलंय’; CM एकनाथ शिंदेंनी डागली उद्धव ठाकरेंवर तोफ
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ…’ हा देखील अत्यंत प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे यंदाही ते भाजपविरोधी भूमिका घेतील, असे वाटले होते. मात्र, आता त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘मी भाजपसोबत कंम्फर्टेबल आहे’, असे म्हटले आहे. त्यामुळे महायुती सत्तेत आल्यास मनसे त्यांच्यासोबत सरकारमध्ये सामील होणार हे उघड झाले आहे.
दरम्यान, मनसेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले आहेत. राज ठाकरेंकडून उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू असून, मुंबईतील माहीम मतदारसंघात त्यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांनाही विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे.
आमच्या पाठिंब्यावरच सरकार
राज्यात महायुतीचे सरकार हे आमच्या पाठिंब्याशिवाय स्थापन होऊ शकणार नाही. जर विषय भाजपचा असेल तर. सुरुवातीपासूनच मी जेव्हा शिवसेनेत होतो. तेव्हापासून माझा पक्ष काढल्यानंतरही माझे चांगले संबंध कोणाशी राहिले तर ते भाजपसोबत. प्रमोद महाजन, गोपीनाथराव, नितीनजी असतील किंवा अटलजी असतील, अडवाणीजी असतील या सर्वच नेत्यांसोबत माझे सुरुवातीपासून संबंध आले, ते भाजप नेत्यांसोबतच.
काँग्रेस नेत्यांसोबत जवळचे संबंध नाहीत
तसेच ‘माझे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत कधी जवळचे संबंध आले नाहीत. त्यामुळे, आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन असतो. मला वाटतं भाजपसोबत मी पहिल्यापासून कम्फर्टेबल आहे. तर आपले पुतणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आणखी रंगतदार बनली आहे’.