Photo Credit- Social Media मंत्रिपद न मिळाल्याने बड्या नेत्याचा राजीनामा
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. मागील दीड महिन्याच्या प्रचारानंतर महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुती राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान झाले. त्यापैकी महायुतीने 234 जागा मिळवून नवा विक्रम रचला आहे. यामध्ये भाजपला 132, शिंदे गट 57 तर अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीच्या या यशानंतर आता आणखी एक लॉटरी महायुतीला लागली आहे.
विधानसभेमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आता महायुतीला विधान परिषदेमध्ये देखील 6 जण आमदार म्हणून पाठवता येणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता ज्या नेत्यांचे तिकीट नाकारण्यात आले होते त्यांना विधान परिषदेवर संधी देता येणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेतील भाजपचे चार आमदारांची वर्णी लागली आहे. सध्या विधानपरिषदेवर आमदार असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे भाजपाचे चार नेते विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या आमश्या पाडवी यांचाही विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झाला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचीही एक जागा विधानपरिषदेत रिक्त होणार आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर यांचा देखील विधानसभेवर विजय झाला आहे. तर शिंदे गट व अजित पवार गट अशी एक एक जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेवर महायुतीच्या 6 जागा रिक्त झाल्या आहेत.
यंदाची विधानसभा निवडणूक ही पहिल्यांदाच भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रितपणे लढत होते. त्यामुळे जागावाटपामध्ये आणि तिकीट देण्यामध्ये अनेक नेत्यांनी मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे या सर्व नाराज नेत्यांना आता विधान परिषदेवर संधी देण्यात येऊ शकते. यामुळे महायुतीच्या नेत्यांना निकालानंतर लॉटरी लागली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
ऑक्टोबरमध्ये विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार
लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील महायुतीमधील नेते विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये सात नेत्यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. या सात जणांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सहा जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे.