फोटो सौजन्य - Social Media
पत्नी शिल्पा सावंतच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने नवीन घर घेतले आहे. या घराची चावी पत्नीला वाढदिवशी तिच्या हातावर भेट म्हणून दिली आहे. या संबंधित पोस्ट स्वतः अभिजीतने त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केली आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अभिजीत आणि शिल्पा तसेच संपूर्ण सावंत कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये घराच्या बाल्कनीत अभिजीतचे कुटुंब उभे आहे. नव्या घराच्या बाल्कनीत गोड सेल्फी घेत त्यांनी नव्या घराची झलक चाहत्यांशी शेअर केली आहे. त्यांच्या हातात नव्या घराची किल्ली आहे.
यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी नवे घर घेतले. त्या यादीमध्ये अभिजीत सावंतचीही एंट्री झाली आहे. शिल्पा सावंतने अभिजीतला त्याच्या या सुंदर भेटीसाठी आभार व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. तिने अभिजीतचे आभार मानले आहे. सध्या अभिजीत ‘रुपेरी वाळूत’ या गाण्यामुळे चर्चेत आला होता. त्याने गायिका सोनाली सोनावणेसह अनेक अल्बम रिलीज केले आहेत.






