Famous marathi content creator list
एक गोष्ट अजून महत्त्वाची ती म्हणजे प्लॅटफॉर्म असूनही तुमच्यात उपजत कला असावी लागते. ती नसेल तर फार कोणी तुम्हाला महत्त्व देणार नाही. असं असतं तर सगळेच क्रिएटर झाले असते पण तसं शक्य नसतं. म्हणून मराठीमध्ये सोशल मीडियाचा वापर करून जे फेमस झाले आहेत त्या कलाकारांची यादी आणि त्यांची मेहनत जाणून घेऊया.
Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई
विनायक माळी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी YouTuber आहे. त्याची विनोद शैली इतरांपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे तो लोकांच्या लगेच लक्षात राहतो. आरमुठ्या म्हणून आपली वेगळी शैली त्याने लोकांसमोर सादर केली. प्रेक्षकांना ही त्याची भूमिका फार आवडली म्हणून त्याचे सगळेच व्हिडिओ मिलियन क्रॉस करतात. त्याचे शेठ माणूस तसेच माझी बायको या सिरीज फार लोकप्रिय आहेत. पनवेलमध्ये जन्मलेल्या या YouTuber ने आगरी-कोळी शैलीत आपला ठसा उमटवला आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध शहर म्हणजे पुणे आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरात मराठीमध्ये जेवढे कलाकार दिसतील त्यातले निम्याहून अधिक पुणे या शहरातून आलेले असतील. त्यापैकी एक म्हणजे अथर्व सुदामे. अथर्वाची विनोदी शैली सुद्धा त्याची खास ओळख आहे. इन्स्टंट जोक तयार करून हसवणे ही त्याची खासियत. पुणेरी टोमणे वापरून जोक तयार करणे, त्यावर रील बनवून लोकांना हसवणे म्हणून त्याच्या रील्स फार व्हायरल होतात. अथर्व मराठी चित्रपट क्षेत्रात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
करण सोनवणे हा Focused Indian या नावाने सोशल मीडियावर फेमस आहे. त्याची कॉमेडी काही प्रमाणात आपल्याला अथर्व सुदामे याची आठवण करून देते. करण relatable comedy, social satire आणि entertaining content तयार करून लोकांना हसवण्याचं काम करत असतो. बिग बॉस मराठीमध्येही त्याने भाग घेतला होता. रील्समधून त्याने स्वतःची acting skills दाखवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Just Neel Things हा सुद्धा मराठीमधील मोठा content creator म्हणून ओळखला जातो. Just Neel Things या नावाने YouTube चॅनलवर तो आपले दैनंदिन व्हिडिओ publish करत असतो. त्याने प्रसिद्ध मराठी वेड लावलं या गाण्यावर आपली कला सादर केली होती. मराठी YouTube community मध्ये त्याचं मोठं नाव असल्यामुळे Insta Fest वर त्याला प्रसिद्धी मिळाली होती.
सौरभ घाडगे हा हजरजबाबी comedy creator आहे. विनोद तयार करण्यासाठी त्याला कधी topic ची गरज लागत नाही. कुठल्याही परिस्थितीवर जोक निर्माण करणे ही त्याची खासियत. Short videos तयार करून social punch मारत लोकांना हसवणे आणि रडवणे ही त्याच्या विनोदाची शैली आहे.
हा असा content creator आहे ज्याने कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपलं अस्तित्व तयार केलं आहे. स्वतःच्या content वर त्याचा फार विश्वास आहे. त्याची मेहनत त्याला वेगळं बनवते. स्त्री पात्र साकारून विनोद निर्माण करणे ही त्याची खासियत आहे. तुंबाडची मंजुळा या आगामी मराठी चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक गुणी कलाकार म्हणून त्याला लोक ओळखत आहेत.
मराठी content creators पाहिले तर लिस्ट तशी भलीमोठी आहे. पण सोशल मीडियाचा वापर करून आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर नेणारे हे काही मोजके कलाकार आहेत ज्यांनी स्वतःची एक खास ओळख तयार केली आहे.






