फोटो सौजन्य - Social Media
ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याचबरोबर घराच्या गृहप्रवेशाची झलक ऐश्वर्याच्या चाहत्यांकडून विशेष पाहिली जात आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. मुळात, नव्या घरात पहिले पाऊल ठेवतानाच क्षण शेअर करण्यात आले आहेत. ऐश्वर्या स्वतःच्या हाताने दारावर असलेली रिबीन कापते आणि गृहप्रवेश करते. या दरम्यान, ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर थोडी बैचैनी जाणवते परंतु तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहित करण्यामध्ये कोणतीही कमी ठेवली नाही.
आडनावाने मराठी भासणारी ऐश्वर्या खरे मूळची मराठी जरी असली तरी तिचे मूळ हे भोपाळचे आहे. भोपाळ सारख्या लहान शहरातून मुंबईकडे येणे आणि येथे येऊन मोठे नाव कमावणे, असा संघर्षाचा तिचा प्रवास आहे. तिच्या या आनंदाच्या क्षणी तिच्या सहकलाकारांनीदेखील तिचा उत्साह वाढवला आहे.
अभिनेत्री सध्या ‘डॉ. आरंभी’ या हिंदी भाषी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. Life Ok या वाहिनेवर झळकणाऱ्या ‘जाने क्या होगा रामा रे’ या मालिकेतून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. पुढे ती ‘लाल इष्क’, ‘ये है चाहते’ तसेच ‘यह शादी है या सौदा?’ या मालिकांमध्ये झळकून आली.
भोपाळसारख्या महाराष्ट्रा बाहेरच्या शहरामध्ये मराठी मूळ कशी?
मराठा साम्राज्याच्या काळात अटक (अफगाणिस्तान) ते कटक (ओडिशा), तसेच पेशावर (पाकिस्तान) ते तंजावर (तामिळनाडू) या भागात मराठा शासकांचे वर्चस्व होते. त्याकाळात मराठी प्रदेशाच्या बाहेरच्या वतनदाऱ्या तसेच संस्थानदेखील मराठा शासकांच्या अधिपत्याखाली होते. त्याकाळी अनेक मराठी मावळ्यांना मराठा शासकांनी त्यांच्या संस्थानात सैनिक म्हणून नेले. त्या मावळ्यांचे वंशज आजही त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे भोपाळसारख्या शहरात आजही मराठी बांधव मोठ्या संख्येने आढळतात.






