फोटो सौजन्य - Social Media
देशात सध्या वेगवेगळ्या आजारांचा प्रकोप वाढताना दिसत आहे. एका बाजूला HMPV (ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस) चे रुग्ण अनेक राज्यांमध्ये आढळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एक रहस्यमय आजार पसरला आहे, ज्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील पुण्यातही एक विचित्र आजार पसरला आहे, जो लोकांच्या पायांची ताकदच काढून घेत आहे. या आजारांमुळे प्रशासन आणि सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका गावात गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूंची मालिका सुरू आहे. जणू काही मृत्यूने तांडवच घातले आहे. या गावात आतापर्यंत 17 लोकांचे प्राण गेले असून, या मृत्यूंचे नेमके कारण काय आहे? हे अजूनही अस्पष्ट आहे. या मृत्यूंना एका लग्नसमारंभाशी जोडले जात आहे. तिथून सुरू झालेली मृत्यूंची मालिका अजूनही थांबलेली नाही. डॉक्टरांचे पथक या आजाराचा शोध घेण्यात गुंतले आहे. एका अहवालानुसार मृतांच्या नमुन्यांमध्ये न्यूरोटॉक्सिन आढळले आहे.
न्यूरोटॉक्सिन हे एक प्रकारचे रसायन आहे, जे मेंदू व नर्व्हस सिस्टिमवर परिणाम करते. हे अन्न, जड धातू, कीटकनाशके किंवा इतर घटकांमुळे शरीरात प्रवेश करू शकते. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, मूड स्विंग, पचनासंबंधी अडचणी, त्वचा आणि केसांचे नुकसान अशा समस्या होऊ शकतात. न्यूरोटॉक्सिनपासून बचावासाठी ताजे फळे, भाज्या व पोषणमूल्यांनी युक्त आहार घ्यावा, पुरेसे पाणी प्यावे, नियमित व्यायाम व योगाचा समावेश करावा, तसेच कीटकनाशक व जड धातूंनी दूषित अन्न टाळावे.
महाराष्ट्रातील पुणे शहरात गुइलेन-बैरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत 26 लोक या आजाराला बळी पडले आहेत. या आजारात इम्यून सिस्टिम नसांवर हल्ला करते, ज्यामुळे मांसपेशींवर परिणाम होतो आणि कमजोरी जाणवते. काही रुग्णांमध्ये हातापाय सुन्न होणे किंवा गंभीर स्थितीत लकवा मारण्याची शक्यता असते.
गुइलेन-बैरे सिंड्रोमपासून बचावासाठी संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी, खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक झाकावे, हेल्दी डाएट घ्यावे, वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी आणि फ्लू व हेपेटायटिस-A च्या लसी घेऊन संसर्गाचा धोका कमी करावा. योग्य काळजी आणि वेळीच उपाय केल्यास या आजारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. या आजारांपासून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या आणि योग्य त्या पथ्यांचे पालन करा.






