(फोटो सौजन्य: istock)
आजकालच्या व्यस्त जीवनात अनेकजण गोष्टी झटपट करून वेळेची बचत करू पाहतात. खासकरून नोकरदार वर्ग आपल्या वेळ वाचवण्याच्या नवनवीन ट्रिक्स शोधत असतात. या कारणास्तव, लोक बरेचदा भाज्या आगाऊ कापतात आणि त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात, जेणेकरून वेळ वाचवता येईल आणि जेवण लवकर बनवता येईल.
पण तुम्हाला माहीत आहे का की काही भाज्या कापून त्या फ्रीजमध्ये ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात आणि त्या लवकर खराबही होतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही भाज्या सांगणार आहोत ज्या फ्रिजमध्ये ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं.
दारू पिणाऱ्या महिलांचा ‘या’ धोकादायक आजारांमुळे होऊ शकतो मृत्यू, वेळीच सावध व्हा
बटाटे
बटाटे ही एक अशी भाजी आहे जी सर्वांनाच खायला फार आवडते आणि त्यामुळेच ती अधिकतर घरात बनवलीही जाते. बऱ्याचदा असे होते की भाजीसाठी अधिक बटाटे कापले जातात. अशात अतिरिक्त कापलेले हे बटाटे आपण फ्रिजमध्ये ठेवू पाहतात आणि नंतर त्यांचा वापर करतात. बटाटे साठवण्यासाठी अनेकजण रेफ्रिजरेटरचा वापर करतात. मात्र असे करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बटाट्यामध्ये असलेले स्टार्च थंड तापमानामुळे विषारी बनू शकते. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले बटाटे खाल्ल्याने डोकेदुखी किंवा मळमळ होऊ शकते.
कांदा
कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका. कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील ओलावा वाढतो, ज्यामुळे कांद्याला बुरशी येऊ शकते. तसेच, चिरलेला कांदा साठवल्याने दुर्गंधी येते, जी इतर खाद्यपदार्थांमध्येही पसरते. त्यामुळे कांदा नेहमी कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावा.
गाजर
अधिकतर लोक गाजर हे नेहमी फ्रिजमध्येच साठवून ठेवतात. मात्र तुमची ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. फ्रिजमधील थंड तापमानामुळे गाजर हळूहळू त्यांचा गोडवा गमावतात. यामुळे गाजरातील पोषक घटक कमी होतात.
काकडी
काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळावे. थंड तापमानामुळे काकडी लवकर कुजण्यास सुरुवात होते आणि त्यातील पोषक घटकही कमी होतात. काकडी ही नेहमी सामान्य खोलीच्या तापमानावर साठवल्यास ती चांगली आणि फ्रेश राहील.
महिलांनो! या गोष्टी चुकूनही करू नका शेअर, इमेज होईल खराब; नात्यातही येऊ शकतो दुरावा
लसूण, अद्रक
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिवाय यामुळे लसणाचा उग्र वास सर्वत्र पसरू लागतो. तज्ज्ञांच्या मते, आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये, अन्यथा आले विषारी होऊ शकते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये आधीपासूनच पाण्याचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे त्याला फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरते. टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यांची चव आणि पोत बदलतो. थंडीमुळे टोमॅटो आतून मऊ होतात, त्यामुळे ते लवकर खराब होतात. टोमॅटो नेहमी खोलीच्या तपमानावर ठेवा, जेणेकरून ते जास्त काळ ताजे राहतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.