नवी मुंबई, 29 सप्टेंबर 2025 : जागतिक हृदय दिनानिमित्ताने वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने व्यवस्थापनाकडून रुग्णसेवेची माहिती दिली. फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने नवी मुंबईतील हृदयासंबंधित आजारांच्या उपचारांत सर्वोत्तम सुविधा देण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उपक्रमामुळे नवी मुंबईतील रुग्णांमध्ये हृदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश मिळाले आहे. हृदयविकाराच्या आजाराने झडणा-या रुग्णांच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून आली.
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णांची वेळेवर तपासणी व्हावी, रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णावर तत्काळ आपत्कालीन उपचार सेवा दिल्या जाव्यात, हृदयासंबंधीत आजारांवर मात करण्यासाठी विविध समूहांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर दिला. या महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे विविध भागांमध्ये हृदयविकाराच्या तातडीच्या उपचारांना गती मिळाली, रुग्णसेवेचा दर्जा सुधारला. अनेकांचे प्राण वाचले. नवी मुंबईतील अनेक रहिवाशांना आता हृदयविकाराविषयी तपशीलवार माहिती मिळाली आहे. विविध समूहांत हृदयविकाराशी संबंधित सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी फोर्टिस रुग्णालय प्रयत्नशील आहे.
या उपक्रमाबाबत वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अनिल पोतदार म्हणाले, “वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाने परिसरातील 5 किलोमीटरच्या परिसरातील नर्सिंग होम्ससोबत भागीदारी केली आहे. रुग्णाला प्रायमरी अक्युट मायोकार्डियल इन्फार्क्शन देणे (पीएएमआय) हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रुग्णाच्या हृदयाचा रक्तपुरवठा अचानक थांबल्यास हृदयाचा तीव्र झटका येण्याचा संभाव्यता असते. या स्थितीत रुग्णाला जलदरित्या विशेष उपचार उपलब्ध केल्यास या उपचारपद्धतीला पीएमआय असे संबोधले जाते. या उपचारपद्धतीमुळे आपत्कालीन हृदयविकाराची परिस्थिती हाताळणे सोप्पे झाले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देणे आता शक्य झाले आहे.
या नव्या उपक्रमामुळे रुग्ण हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आल्यापासून डॉक्टरांनी त्यांची बंद झालेली धमनी उघडून शस्त्रक्रिया करण्याच्या वेळेत कमालीची घट केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ही वेळ 71 मिनिटे होती. यंदाच्या10-15 वर्षांत ही वेळ केवळ 54 मिनिटांपर्यंत दिसून आली. काही केसेसमध्ये 35मिनिटांत रुग्णाला उपचार देता आहे. याचा अर्थ रुग्णांना तत्काळ उपचार देण्याच्या गतीमानतेत 24टक्क्यांनी वाढ झाली. काही केसेसमध्ये ही वाढ 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली. यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्याच्या टक्केवारीतही सुधारणा झाली. या संयुक्तिक प्रयत्नांमुळे अधिकाधिक रुग्णांचे जीव वाचवता येतात. शिवाय आरोग्य सेवेचा दर्जा उंचावतो. गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांना तत्काळ उपचार देता येतात.”
वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. प्रशांत पवार म्हणाले, “नागोठणे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेडमिल टेस्ट मशीन्स बसवल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांचे निदान लवकर होत आहे. या भागांत गेल्या वर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत 625 टीएमटी चाचण्या झाल्या. यापैकी 65 रुग्णांमध्ये हदयविकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराचे निदान झाले. निदान झालेल्या सर्व रुग्णांच्या पुन्हा आवश्यक तपासण्या झाल्या. त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
निदान पद्धतींचा दर वाढल्याने आम्ही संबंधित आजारांचा धोका असलेल्या रुग्णांना ओळखू शकलो. लवकर निदान व योग्य उपचारांमुळे संभाव्य हृदयविकराच्या झटक्यांना प्रतिबंध करु शकलो. मृत्यूस कारणीभूत ठरणा-या हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच रुग्णांचे प्राथमिक टप्प्यातच निदान होणे आवश्यक असते. या उपक्रमामुळे चांगला सकारात्मक परिणाम दिसून आला. हृदयविकाराशी संबंधित मृत्यूदरात लक्षणीय प्रमाणात घट नोंदवली गेली. रुग्ण गोल्डन पिरिएडमध्ये उपचारांसाठी येत असल्याने त्यांचे जीव वाचवता येणे शक्य झाले आहे. हे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही सुधारणा दिसून येत आहे.”
आज फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने नवी मुंबईतील आपत्कालीन हृदयविकाराच्या उपचारांना बळ देण्यासाठी परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ५० परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आता नवी मुंबईत हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तातडीने आणि प्रभावीपणे उपचार देण्याच्या उपचारपद्धतीत वाढ झाली आहे.
नागोठणे, पलावा, खोपोली, पनवेल आणि रोहा येथे दर महिन्याला आयोजित होणा-या बाह्यरुग्ण तपासणी शिबिरांमध्ये सुमारे 130 रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते. यापैकी 6 ते 8टक्के रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयाला भेट देणे आवश्यक असते. ही टक्केवारी ध्यानात घेतल्यास, हृदयविकाराशी संबंधित आजाराचे निदान लवकर होणे तसेच वेळेवर उपचारास सुरुवात होण्याचे महत्त्व दिसून येते. रुग्णालयीन उपचार झालेले रुग्ण दोन आठवड्यांत कामावर रुजू झाले. त्यांच्या प्रकृतीत तातडीने होणारी सुधारणा ध्यानात घेता ही उपचारपद्धती 100 टक्के यशस्वी होत असल्याचे सिद्ध होते.
फोर्टिस हिरानंदानीचे सेवा संचालक नितीन कमारिया म्हणाले, “नवी मुंबईतील अनेकांच्या हृदयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जागतिक हृदयदिनानिमित्ताने या रुग्णसेवेची बांधिलकी व्यक्त करण्याची संधी मिळते. या दिनानिमित्ताने आम्ही डोन्ट मिस द बीट या संकल्पनेवर आधारित कार्डिओलॉजी कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत उपस्थित राहणा-यांना प्रमाणपत्र दिले गेले.
कार्यशाळेत आरोग्यसेवा व्यावसायिक, आपत्कालीन प्रतिसादकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी हजेरी लावली होती. यात तीव्र कोरोनरी सिंड्रोम, पीएएमआय मार्ग आणि मूलभूत आणि अत्याधुनिक कार्डियाक लाइफ सपोर्ट, हॅण्ड ऑन ट्रेनिंगबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. फोर्टिसच्या नवी मुंबई हार्ट नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही गंभीर स्वरुपातील हृदयाची काळजी घेण्याविषयीची आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. आम्ही लोकांना हृदयविकार रोखण्याविषयीची आवश्यक माहिती देत आहोत. या प्रयत्नांमुळे आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. रुग्णांचे जीव वाचवणे आता शक्य झाले आहे.”
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने आपले नेटवर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले असून, हृदयाचे आरोग्य सुधारण्याविषयी तसेच हृदयविकाराच्या आजारांवर प्रतिबंध आणण्यासाठी जागरुकता वाढण्यावर भर दिला आहे. याकरिता स्थानिक आरोग्यसेवा पुरवठादारांना सहकार्य दिले जात आहे. लवकर निदान होणे, तातडीने उपचार देणे तसेच समुदाय केंद्रित उपाययोजना राबवणे यासाठी फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल प्रयत्नशील आहे. वाढत्या हृदयविकाराच्या आजारांवर मात करणे तसेच निरोगी व हृदयाच्या आजारांबाबत सजग असलेला समाज निर्माण करणे हे फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्य उद्देश आहे.