PM Modi Gandhinagar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. मंगळवारी गांधीनगरमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, दहशतवाद ही पाकिस्तानची सुनियोजित युद्धनीती आहे. ते म्हणाले की, जर काँग्रेसने सरदार पटेलांचे शब्द स्वीकारले असते तर गेल्या ७५ वर्षांपासून सुरू असलेली दहशतवादी घटनांची मालिका थांबली असती. दहशतवादासोबतच पंतप्रधानांनी देशाच्या विकासाचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचा…
६ मे च्या रात्री मारल्या गेलेल्यांच्या पार्थिवांना पाकिस्तानमध्ये राजकीय सन्मान देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानचे झेंडे लावण्यात आले आणि तेथील सैन्याने त्यांना सलामी दिली.
यावरून हे सिद्ध होते की दहशतवादी कारवाया हे प्रॉक्सी युद्ध नाही, तर ते तुमचे (पाकिस्तानचे) सुनियोजित युद्ध धोरण आहे.
जर तुम्ही युद्ध लढत असाल तर तुम्हालाही असेच उत्तर मिळेल.
यावेळी आम्ही कॅमेऱ्यांची पूर्ण व्यवस्था केली होती जेणेकरून कोणीही पुरावे मागू नयेत.
“… हा तर मुख्यमंत्री फडणवीसांचा राजहट्ट”; मुंबईच्या तुंबईवरून हर्षवर्धन सपकाळांची सडकून टीका
१९४७ मध्ये भारतमातेचे तुकडे झाले. साखळ्या कापायला हव्या होत्या पण हात कापले गेले. देशाचे तीन भाग झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला.
पाकिस्तानने मुजाहिदीनच्या नावाखाली दहशतवाद्यांच्या मदतीने भारतमातेचा एक भाग काबीज केला. जर त्या दिवशी हे मुजाहिदीन मारले गेले असते आणि सरदार पटेलांचा सल्ला मान्य केला असता, तर गेल्या ७५ वर्षांपासून सुरू असलेली ही (दहशतवादी घटनांची) मालिका पाहिली नसती.
“जेव्हा एखाद्या विकासाच्या कल्पनेला कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्या निर्णयांचे परिणाम किती सकारात्मक आणि दूरगामी असू शकतात, हे आज स्पष्टपणे दिसून येत आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. “तो काळ होता, जेव्हा आम्ही रिव्हर फ्रंट विकसित करण्याचे स्वप्न पाहिले — आणि ते यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवले. त्यानंतर जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्याची कल्पना समोर आली आणि तीही पूर्णत्वास नेली. याच काळात, जगातील सर्वात उंच पुतळा – स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्याचा निर्धार केला आणि तोही यशस्वीरित्या पूर्ण झाला.”
काल २६ मे होता… २६ मे २०१४ रोजी मला पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या क्रमांकावर होती.
जगातील सर्वात भयावह अॅनाबेल डॉल झाली गायब? सर्वांची धडधड वाढली, नेमकं सत्य काय?
आपण कोरोनाशी लढलो, आपल्या शेजाऱ्यांकडून येणाऱ्या समस्यांना तोंड दिले, नैसर्गिक आपत्तींनाही तोंड दिले, तरीही इतक्या कमी वेळात आपण ११ व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो. कारण आपल्याला विकास हवा आहे, आपल्याला प्रगती हवी आहे.
येणाऱ्या काळात आपण पर्यटनावर भर दिला पाहिजे. गुजरातने चमत्कार केले आहेत. कच्छच्या वाळवंटात, जिथे पूर्वी कोणीही जात नव्हते, आज तिथे जाण्यासाठी बुकिंग उपलब्ध नाही, अशी कल्पना करता येते. गोष्टी बदलता येतात.