रोसो : 13 हजार कोटींचा गैरव्यवहार करुन, देशातून पलायन केलेला हिरा व्यापारी मेहपुपल चौकसी याला देशात परत आणणं अवघड होऊन बसलंय. चौकसी सध्या बारबुडा आणि एंटिगुआत लपलेला आहे. त्या ठिकाणी असलेल्या हायकोर्टानंही मेहुलच्या बाजूनं निकाल दिलाय.
हायकोर्टाच्या आदेशाशिवाय मेहुल चौकसीला एंटिगुआ आणि बारबुडातून बाहेर नेण्यास मज्जाव करण्यात आलाय. 63 वर्षांचा हिरे व्यापारी मेहुल चौकसी हा पंजाब नॅशनल बँकेच्या 13 हजार कोटींच्या गैरव्यवहारात भारतात वॉन्टेड आहे.
चौकशीनं केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआय करतेय. त्याला परत भारतात आणण्यासाठी सीबीआय प्रयत्नशील आहे. तिथल्या कोर्टाच्या निर्णयानंतरही सीबीआय त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. मेहुलला चौकशीला देशात आणून देशाच्या कोर्टासमोर हजर करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलंय.
या प्रकरणात सीबीआय़नं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यात भारतातून पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्यासाठी विदेशातील लॉ इन्फोर्समेंट यंत्रणांसोबत समन्वय साधून योग्य पावलं उचलण्यात येत असल्याचं नमूद करण्यात आलंय. हे पलायन केलेले आरोपी कुठे आहेत यांचा शोध घेण्यात येत असून, योग्य सनदशीर मार्गांनी त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. गेल्या 15 महिन्यांतं अशा 30 आरोपींना देशात परत आणण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.
2018 पासून सुरु आहे प्रकरण
1. पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या मेहुल चौकसी आणि इतर आरोपींविरोधात 15 फेब्रुवारी 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
2. त्यानंतर 2022 साली बँका आणि आर्थिक संस्थांची फसवूणक केल्याप्र्करणी मेहुल चौकसी आणि इतरांविरोधात 5 अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात आलेत.
3. 2018 साली चौकसीनं इंटरपोलशी संपर्क साधून त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करु नये अशी विनंती केली होती.
4. इंटरपोलमधील सीसीएफ या स्वायत्त यंत्रणेकडे हे अपील करण्यात आलं होतं. सीसीएफवर इंटरपोलचे नियंत्रण नाही, विविध देशांतील वकील ही यंत्रणा चालवतात.
5. त्यानंतर सीसीएफनं याबाबत सीबीआयशी चर्चा केली. सीबीआयकडून चौकसीला दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.