संग्रहित फोटो
छत्तीसगडमध्ये मंगळवारी रात्री एका खासगी कंपनीची बस 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात (Chhattisgarh Bus Accident) 14 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. हा घटना ताजी असतानाच आता बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने एका झोपडीला आग (Bihar fire incident) लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. हे सातही जण एकाच कुटुंबातील होते.या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
[read_also content=”कर्मचाऱ्यांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत पडली, 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी! https://www.navarashtra.com/india/14-employees-died-after-bus-fell-in-50-feet-deep-ravine-at-chhattisgarh-nrps-522227.html”]
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सासारामच्या इब्राहिमपूर गावात ही घटना घडली. झोपडीला आग लागली तेव्हा कुटुंबीय घरातच होते. पुरुष सदस्य बाहेर होते. या आगीत घरात उपस्थित असलेल्या तीन महिला आणि पाच मुले आतमध्ये अडकली. आग चारही बाजूंनी पसरली आणि संपूर्ण झोपडीला आग लागली. वाऱ्यामुळे ज्वाला अधिकच तीव्र होत होत्या. लोकांनी आग आटोक्यात आणण्याआधी, बहुतेक जण गुदमरून आणि भाजल्याने मरण पावले. केवळ एका महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये पुष्पा देवी (30), तिच्या दोन मुली – काजल कुमारी (4) आणि गुडिया (2) आणि मुलगा बजरंगी कुमार (6) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये कांती कुमारी (6), शिवानी (3) आणि माया देवी (25) यांचाही समावेश आहे. तिघेही पुष्पाचे नातेवाईक होते. आणखी एक गंभीररीत्या भाजलेल्या राजू देवी या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिक्रमगंजचे उपविभागीय दंडाधिकारी अनिल बसाक यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घडली. आग लागली तेव्हा सर्व बळी झोपडीत होते. माहिती मिळताच संबंधित अधिकारी बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई मिळावी याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुःखद घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सीएमओ म्हणाले की, या दुःखद घटनेत अनेक लोकांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना.