झोपेत असताना 6 वर्षांच्या चिमुकलीवर काकाने केला अत्याचार; नराधमास अटक

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील चांदपूर येथे एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या काकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही चिमुकली झोपेत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी 42 वर्षीय नराधम काकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

    फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील चांदपूर येथे एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या काकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही चिमुकली झोपेत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी 42 वर्षीय नराधम काकाला पोलिसांनी अटक केली आहे.

    चांदपूर पोलिसांनी याबाबत सांगितले की, पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोमवारी पीडितेच्या वडिलांचा मोठा भाऊ रामशंकर याला अटक करण्यात आली. घटनेच्या वेळी पीडिता तिच्या घराच्या टेरेसवर एकटीच झोपली होती. तेव्हा तिचा काका त्याच्या शेजारच्या घरातून टेरेसवर पोहोचला आणि तिला धमकावून अत्याचार केला. या धक्कादायक प्रकाराची माहिती या मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर तातडीने पोलिसांत तक्रार देण्यात आली.

    सध्या पीडीत मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती सुधारत आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.