भोपाळ : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका टोळक्याने 18 वर्षीय दलित तरुणाला (Dalit Youth) बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या टोळक्याने तरुणाच्या आईला नग्न करत मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, मुख्य आरोपीसह नऊ जणांना अटक केली असून, अन्य आरोपींचा (Crime in Bhopal) शोध सुरू आहे.
मृत तरुणाच्या बहिणीने 2019 मध्ये आरोपीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. संबंधित खटला मागे घ्यावा, यासाठी आरोपींकडून दलित कुटुंबावर दबाव टाकला जात होता. घटनेच्या दिवशी काही आरोपी पीडितेच्या घरी गेले. यावेळी आरोपी विक्रम सिंह ठाकूर याने आधी पीडितेच्या घराची तोडफोड केली. त्यानंतर भावाची हत्या केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पीडितेच्या आईलाही विवस्त्र करत मारहाण केली. नितीन अहिरवार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
9 आरोपींना अटक
18 वर्षीय नितीन ऊर्फ लालू असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. इतर तीन ते चार अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.