प्रयागराज : पती-पत्नीचं नातं विश्वासावर चालतं असं म्हणतात. संसारात काही कमी-जास्त झालं तरी जोडीने ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न असतो. पण उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक अनोखी घटना घडली. चतुर्थ श्रेणीतील नोकरदार पतीने पत्नीला उच्च शिक्षण देऊन पीसीएस अधिकारी (PCS Officer) बनवले, पण पीसीएस अधिकारी झालेल्या पत्नीने पतीलाच (Prayagraj Crime) दगा दिला. इतकंच नाही तर नवऱ्याला मारून दुसऱ्याशी राहण्याचा तिचा प्लॅन असल्याची माहिती समोर येत आहे.
सूर्यवंशम या हिंदी चित्रपटाला शोभेल अशीच काहीशी ही स्टोरी आहे. चतुर्थ श्रेणीतील नोकरदार पती असलेल्या आलोक मौर्य यांनी त्यांची पत्नी ज्योती मौर्य हिला चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काबाडकष्ट केले, रात्रीचा दिवस केला आणि पत्नीला उच्च शिक्षण घेऊन पीसीएस अधिकारी बनवले. पण पीसीएस अधिकारी झालेल्या पत्नीनेच पतीला दगा दिला. पतीला मारण्याचाही तिचा प्लॅन असल्याचीही माहिती समोर आली आहे.
तुटपुंज्या पगारावर पत्नीचे शिक्षण
आलोक मौर्य यांनी सांगितले की, 2009 मध्ये त्यांची पंचायत राज विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून निवड झाली होती. प्रतापगडमध्ये पोस्टिंग झाली. 2010 मध्ये वाराणसीतील चिराई गावात राहणाऱ्या ज्योतीसोबत त्यांचे लग्न झाले. ज्योतीने लग्नानंतर पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. आलोक मौर्य यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या तुटपुंज्या पगारातून पत्नीच्या शिक्षणासाठी पैसे साठवले.
पत्नीला तिच्या प्रियकरासह पकडले रंगेहात
2019 मध्ये, आलोकने त्याच्या वडिलांच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून ज्योती मौर्याच्या नावाने धुमनगंजच्या झालवा येथे घर विकत घेतले. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण, 2020 मध्ये होमगार्ड कमांडंट पदावर असलेल्या मनीष दुबे नावाच्या एका व्यक्तीसोबत पत्नीचे संबंध असल्याचा त्याला संशय आला. आलोक मौर्य यांनी पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण काही सुधारले नाही. त्यामुळे आता हे प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन ठेपले आहे.