'महिन्यापूर्वीच सिलेक्शन अन् विदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न'; ३ मुलासंह लंडनला निघालेल्या दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू
एक महिन्यापूर्वी डॉक्टर प्रतीक लंडनला गेले होते. त्यांच्या घरी त्यांच्या डॉक्टर पत्नी कौनी व्यास तीन मुलांसह राहत होत्या. दोघंही पूर्वी एकाच हॉस्पिटलमध्ये काम करत होते. घरून एकत्र येणं-जाणं होतं, पण प्रतीक इतक्या दूर गेल्यावर कौनी उदास राहू लागल्या होत्या. त्यांना वाटत होतं की त्या लवकरच प्रतीककडे जावं… कदाचित त्यांच्या भावना प्रतिक यांच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात. यूकेमधल्या ज्या हॉस्पिटलमध्ये प्रतीकचं एक महिन्यापूर्वी सिलेक्शन झालं होतं, तिथेच आता कौनीही डॉक्टर झाल्या होत्या. म्हणजे पती-पत्नी पुन्हा एकत्र येतील, एकत्रच ये-जा करतील. प्रतीक पत्नी कौनी आणि मुलांना घेण्यासाठी आपल्या घरी आले होते. सामान पॅक केलं, आई-वडिलांचं आशीर्वाद घेतलं आणि एअर इंडियाच्या फ्लाइटसाठी रवाना झाले. पण फ्लाइटच्या टेकऑफनंतर काहीही शिल्लक राहिलं नाही. ना स्वतः राहिले, ना पत्नी राहिल्या आणि ना तीनही मुले… मागे राहिल्या त्या फक्त असंह्य वेदना…
आज अहमदाबादमध्ये एक अशी हृदयद्रावक दुर्घटना घडली. जो कधीही विसरता येणार नाही. राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील एक कुटुंबही या अपघातात आपले प्राण गमावून बसलं. डॉ. कौनी व्यास, त्यांचे पती डॉ. प्रतीक जोशी, मुलगी नियारा जोशी, मुलगा नकुल आणि प्रद्युत जोशी हे सर्व एअर इंडियाच्या याच विमानात होते. डॉ. कौनी यांनी नुकतीच उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमधून राजीनामा देऊन लंडनमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. आज त्या आपल्या पती प्रतीक जोशी यांच्यासोबत लंडनच्या फ्लाइटमध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांची तीनही मुलंही होती. पण अपघातात सर्वांचं निधन झालं. या अपघाताने संपूर्ण बांसवाडा शोकमग्न झाला आहे.
कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितलं की दोघं पती-पत्नी डॉ. प्रतीक जोशी आणि डॉ. कौनी व्यास उदयपूरच्या उमरडा येथे असलेल्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये एकत्रच काम करत होते. फक्त एका महिन्यापूर्वीच डॉ. प्रतीक यांनी हॉस्पिटलमधील नोकरी सोडून लंडन गाठलं होतं. त्यांच्या जाण्यानंतर पत्नी आणि तीन मुलं घरीच राहत होते. काही दिवसांनी डॉ. कौनी व्यास यांनीही पॅसिफिक हॉस्पिटलमधून राजीनामा दिला आणि संपूर्ण कुटुंबासोबत लंडनला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांचंही सिलेक्शन त्याच हॉस्पिटलमध्ये झालं होतं, जिथं डॉ. प्रतीक कार्यरत होते.
तरीही आज एअर इंडियासोबत त्यांचा हा प्रवास जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला. कुटुंब लंडनमध्ये स्थलांतर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून निघालं होतं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. विमान क्रॅश झाल्याची बातमी कळताच संपूर्ण बांसवाडा शोकसागरात बुडाला. जोशी कुटुंब जिल्ह्यात अत्यंत सन्माननीय आणि शिक्षित कुटुंब म्हणून ओळखलं जातं. डॉ. प्रतीक जोशी यांचे आई-वडीलही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते. संपूर्ण कुटुंब – आई-वडील, पती-पत्नी सगळे डॉक्टर होते आणि समाजसेवा करत होते.
जसेच ही दुर्दैवी बातमी स्थानिकांपर्यंत पोहोचली, जोशी कुटुंबाच्या घरी शेकडो लोक जाऊन पोहोचले. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. शोकमग्न लोकांचं म्हणणं आहे की हे कुटुंब केवळ व्यावसायिकदृष्ट्या सक्षम नव्हतं, तर सामाजिकदृष्ट्याही अतिशय सक्रीय होतं. दरम्यान, प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. डॉ. प्रतीक यांच्या आईला धक्का बसला आहे. त्या कोणाशीही बोलू शकत नाहीत – फक्त मुलगा, सून आणि नातवंडांची आठवण काढून रडत आहेत. डॉ. प्रतीक यांचे वडील कसाबसं स्वतःला सावरून आहेत.
एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद एअरपोर्टवरून गुरुवारी दुपारी १:३९ वाजता (IST) रनवे २३ वरून उड्डाण करताच लगेचच क्रॅश झालं. उड्डाण होताच पायलटनं ATC ला MAYDAY कॉल दिला, पण त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही. विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यात २ पायलट, १० क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी होते. अपघातात आतापर्यंत एका प्रवाशाच्या वाचल्याची माहिती समोर आली आहे.