लंडनमधील मुलाला भेटण्याची इच्छा राहिली अधुरी; महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू
एअर इंडियाचं विमान अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ केल्यानंतर काही क्षणात कोसळलं. या अपघाताने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून २०४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. दरम्यान या अपघातात महाराष्ट्रातील काही प्रवाशी, पायलट आणि क्रूमेंबर्सचा मृत्यू झाला आहे. मुलांना भेटण्यासाठी लंडनला निघालेल्या सांगोल्यातील दाम्पत्याचाही विमान अपघाता मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूने त्यांची दोन मुलं पोरकी झाली आहेत.
महादेव पवार ( वय ६७) आणि आशा पवार ( वय ५५) अशी दोघांची नावं आहेत. पवार दाम्पत्याचा मुलगा लंडनमध्ये व्यावसायिक आहे. दरम्यान आज ते मुलाकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबादमध्ये व्यवसाय करत आहे. दोघांच्या आकस्मिक जाण्याने दोन्ही मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
#WATCH | Air India Plane Crash | Ahmedabad: Union Home Minister Amit Shah says, “This afternoon, Air India flight AI-171 crashed and many passengers are feared dead. The entire nation is grieving and is standing together with the bereaved families… The central government… pic.twitter.com/HTy00BWNVy
— ANI (@ANI) June 12, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को पायलेट सुमित सभरवाल यांचा मृत्यू झाला आहे. सुमित यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सभरवाल यांचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. एअर इंडियाचं विमान अहमदाबादहून टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर पुन्हा बोलेन, असं सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमित यांच्या पाश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे. त्यांच्या बहिणीला अपघाताची माहिती मिळताच त्या दिल्लीहून सुमितच्या मुंबईतील घरी पोहोचल्या. त्यानंतर सुमितचे वडील आणि बहीण मुंबई विमानतळावरून गुजरातकडे रवाना होणार आहेत.
Delegation of the European Union to India flag is lowered to half-mast in memory and respect of all citizens who lost their lives in the #AhmedabadPlaneCrash: Ambassador Hervé Delphin, Delegation of European Union to India
(Pic: Hervé Delphin/X) pic.twitter.com/fTR9wgmow3
— ANI (@ANI) June 12, 2025