नवी दिल्ली – पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत वापरलेली शस्त्रे पंजाब पोलिसांना सापडली आहेत. हत्येमध्ये तीच शस्त्रे वापरली गेली होती, जी शार्पशूटर मनप्रीत मन्नू आणि जगरूपा रूपा यांच्याकडून जप्त करण्यात आली होती. अमृतसरमधील अटारी सीमेजवळ पंजाब पोलिसांसोबत दोघांची चकमक झाली होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली एके-४७ आणि ९ एमएमची पिस्तुलच हत्येत वापरली गेली. पोलिसांनी ही शस्त्रे आणि मुसेवाला ज्या ठिकाणी मारला त्या ठिकाणच्या गोळीबाराच्या खुणांची फॉरेन्सिक तपासणी केली. ज्यामध्ये याची पुष्टी झाली.
मुसेवालाच्या हत्येसाठी कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने सर्वांना शस्त्रे पुरवली होती. ज्या शस्त्रांनी मुसेवाला मारला गेला ती शस्त्रे फौजी, अंकित सेरसा आणि कशिश यांच्याकडून काढून घेण्यात आली. जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू ही शस्त्रे घेऊन गेले होते. मन्नूने एके-४७ मधून गोळीबार केला होता. कशिश, फौजी आणि सेरसा यांना बॅकअपमध्ये स्वतंत्र शस्त्रे देण्यात आली होती. जी त्यांनी हिसार गावात लपवून ठेवली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.