जागावाटप आणि उमेदवारीवरून अमित शाहांची इंडिया आघाडीवर टीका
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. अशातच एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी काँग्रेस आणि महाआघाडीवर निशाणा साधला आहे. ” महाआघाडीने जागा किंवा नेता निश्चित केलेला नाही. बिहारमधील जनता राहुल गांधींना विसरली आहे. निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. एसआयआर देशभरात लागू केला पाहिजे. अशी प्रतिक्रीया अमित शाहांनी दिली आहे. तसेच, एनडीएमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार
अमित शहा म्हणाले, “घुसखोर देशात मतदान कसे करू शकतात? परदेशी नागरिक बिहारचे भवितव्य ठरवतील का? आम्ही अशा लोकांना निवडकपणे देशातून हाकलून लावू. एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करेल. आरजेडी ध्रुवीकरण करत आहे. आम्ही ते करत नाही. यापूर्वी बिहारमध्ये जंगलराज होते. पुढील १० वर्षांत बिहार पूरमुक्त होईल.” असं आश्वासनही त्यांनी यावेळी बिहारच्या जनतेला दिले.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीतील १२१ जागांपैकी पहिल्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया १७ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी ते सासाराम, गया आणि भागलपूरला भेट देतील.
ते २८ ऑक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पटना येथे सभा घेणार आहेत. पंतप्रधानांचा तिसरा दौरा १ नोव्हेंबर रोजी छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूर येथे असेल. ३ नोव्हेंबर रोजी ते पश्चिम चंपारण, सहरसा आणि अररियामधील फोर्ब्सगंज येथे सभा घेणार आहेत.
Sanjay Gaikwad News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण
गृहमंत्री अमित शहांनी बिहारमध्ये उद्योग व विकासाच्या मु्द्द्यावर बोलताना म्हणाले की, “बिहारमध्ये जमीन कमी असल्याने मोठ्या उद्योगांऐवजी अशा उद्योगांना प्राधान्य द्यावे जे कमी जमीन घेतील. आम्हाला बिहारला देशाचे एआय हब बनवायचे आहे. येत्या १० वर्षांत बिहार कामगार निर्यात करणारे राज्य राहणार नाही, तर सॉफ्टवेअर उद्योगाचे केंद्र बनेल. “या उद्योगासाठी योग्य तरुणांसाठी संधी निर्माण करणे आणि त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
बिहारमध्ये दरवर्षी होणाऱ्या पुरांचा उल्लेख करत शहांनी सांगितले की, चंद्रगुप्त मौर्यच्या काळापासून नेपाळचे पाणी गंगेच्या माध्यमातून बिहारमध्ये वाहत आहे. “नरेंद्र मोदींनी २०२४ च्या अर्थसंकल्पात कोसी प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची घोषणा केली. हे प्रकल्प वेगाने सुरू आहेत. ५०,००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल आणि पुढील १० वर्षांत बिहार पुराच्या परिणामांपासून मुक्त होईल,” असे शहांनी सांगितले.