गुहागरात रंगणार चुरशीच्या लढती (फोटो- टीम नवराष्ट्र)
जिपच्या ५ जागांसाठी १२ उमेदवार
पंसच्या १० जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात
कोंडकारुळ पंचायत समिती गणात होणार दुरंगी लढत
वरवेली: ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षीक निवडणूकी मध्ये तालुक्यातील ५ जि. प. च्या जागेसाठी १२ उमेदवार तर पंचायत समितीच्या १० जागेकरीता २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व लढती चुरशीची होतील असेच राजकीय जाणकारांनी विश्लेषण केले आहे. असगोली जि. प. मतदार संघातून शिवसेना उबाठाचे माजी जि. प. अध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव विरुद्ध शिवसेना शिंद गटाचे संतोष जैतापकर यांचेमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे.
या ठिकाणी राष्ट्रवादीचे फरहानखान तर अपक्ष म्हणून बळीराज सेनेचे अरुण भुवड आपले नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी असगोली पंचायत समितीमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या उवीं उमेश खैर तर शिंदे सेनेच्या पुनम उदय रावणंग यांचेत चुरशीची लढत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रावणी शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच अंजनवेल पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सारिका दाभोळकर यांचे विरुद्ध शिवसेना उबाठा गटाच्या प्राजक्ता जांभारकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा
आहे तर काँग्रेसचे रियाज ठाकुर, राष्ट्रवादीचे संतोष जोशी व बसपाचे सखाराम पंवार रिंगणात आहेत. कॉडकारुळ जि. प. गटातून शिवसेना उबाठाच्या मानसी घाणेकर तर भाजपाच्या अपूर्वा बारगोडे याचेमध्ये दुरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवती बने याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. श्रृंगारतळी जि. प. गटातून भाजपाचे डॉ. राजेंद्र पवार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांचेमध्ये दुरंगी लढत असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या लढतीकडे आहे.
Ratnagiri News: राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक; सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत
या ठिकाणी श्रृंगारतकी पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते गौरव वेल्हाळ व शिवसेना उबाठाचे संजय पवार यांचेमध्ये सरळ लढत असून कोण जिंकेल?, याची आजतरी खात्री नाही. याच गटातील तळवली पंचायत समिती गणामधून भाजपाचे मंगेश जोशी व शिवसेना उबाटाचे संदिप चनावडे याचे मध्ये चुरशीची लढत रंगणार आहे तर काँग्रेसचे रियाज ठाकुर, राष्ट्रवादीचे संतोष जोशी व बसपाचे सखाराम पवार रिंगणात आहेत. कोंडकारुळ जि. प. गटातून शिवसेना उबाठाच्या मानसी घाणेकर तर भाजपाच्या अपूर्वा बारगोडे यांचेमाचे दुरंगी लढत रंगणार आहे. तसेव था जि. प. गटातील कोंडकारुळ पंचायत समिती गणातून शिवसेना उबाठाचे महेश गोवळकर तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रणव पोळेकर यांच्यामध्ये चुरशीची दुरंगी लढत होणार आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






