ISRO नं दिली आंनदाची बातमी, आदित्य L1 मधील पेलोडनं काम करण्यास केली सुरुवात

आदित्य सोलर मिशन (solar mission ) 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले होते. STEPS इन्स्ट्रुमेंट 10 सप्टेंबर 2023 रोजी लाँच झाले. SWIS टूल 2 नोव्हेंबर, 2023 रोजी सक्रिय करण्यात आले आणि चांगले कार्य केले.

  ISRO ने 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आदित्य-L१ अंतराळयान प्रक्षेपित केले. सूर्यमाला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन आदित्य सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात आता इस्रोकडून मोठी अपडेट आली आहे. आदित्य-L१ च्या सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट’ हा पेलोड कार्यरत झाला आहे आणि तो सामान्यपणे कार्य करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

  इस्रोच्या दिलेल्या माहितीनुसार ‘आदित्य-एल1’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा आहे. पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या Lagrangian बिंदू ‘L1’ च्या भोवतालच्या प्रभामंडलातून ते सूर्याचा अभ्यास करत आहे.

  आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) मध्ये सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) आणि सुपरथर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) या दोन अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.

  STEPS टूल 10 सप्टेंबर 2023 रोजी लाँच करण्यात आले. SWIS टूल 2 नोव्हेंबर, 2023 रोजी सक्रिय करण्यात आले आणि चांगले कार्य केले. इस्रोच्या म्हणण्यानुसार या उपकरणाने सौर पवन आयन, प्रामुख्याने प्रोटॉन आणि अल्फा कण यशस्वीरित्या मोजले आहेत.

  2 सप्टेंबरला आदित्य L1 चं यशस्वीरीत्या लाँच

  ISRO ने 2 सप्टेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताचे पहिले सौर मिशन आदित्य L1 प्रक्षेपित केले. प्रक्षेपणासाठी PSLV-XL या रॉकेटचा वापर  करण्यात आला. सूर्यमाला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आदित्य त्याचा प्रवास लोअर अर्थ ऑर्बिट (LEO) पासून सुरू करेल. त्यानंतर ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या म्हणजेच स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स (SOI) च्या बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल.