मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (फोटो- ट्विटर)
आसाम सरकारच्या विधानसभेत कायदा मंजूर
एकापेक्षा जास्त लग्न केल्यास होणार कारवाई
लवकरच यूसीसी लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
Assam News: आसाम सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वातइल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आसाम राज्यात आता एकापेक्षा अधिक लग्न करणे हा कायद्याने (Law) गुन्हा असणार आहे. आसाम विधानसभेत हा कायदा मंजूर करण्यात आला आहे.
विधानसभेत हा कायदा मंजूर झाल्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. खरे मुस्लिम या कायद्याचे स्वागत करतील असे, हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत. त्यांनी राज्यात लवकरच यूसीसी लागू करण्याबाबत देखील भाष्य केले आहे.
असम में मुसलमान समुदाय लगभग 20-30 विधानसभा सीटों की विजेता तय करता है। लेकिन कई दशकों तक असम में मुस्लिम बहनें विधायक नहीं बन सकीं। बहुविवाह और बाल विवाह को रोककर हम अपनी बहनों के सशक्तिकरण को बढ़ावा देना चाहते हैं। pic.twitter.com/rW1IPKxfqH — Himanta Biswa Sarma (@himantabiswa) November 27, 2025
आसाम बहुविवाह प्रतिबंधक कायदाअंतर्गत आता एकापेक्षा जास्त लग्न करणे हा गंभीर गुन्हा समजला जाणार आहे. यात जे दोषी आढळतील त्यांना 7 वर्षांचा तुरूंगवास, आर्थिक दंड अशी शिक्षा होऊ शकते. जे पहिले लग्न लपवून दुसरे लग्न करतील त्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. हा कायदा अनुसूचित जमाती आणि सहाव्या अनुसूत्री क्षेत्रांना लागू असणार नाही.
सतेत आल्यावर यूसीसी लागू करणार
बहुविवाह कायदा हा समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबत पहिले पाऊल समजले जात आहे. पुन्हा सतेत आल्यास विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात यूसीसी लागू करतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गायकाच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा
बॉलीवूड गायक झुबिन गर्गचा सिंगापूरमधला मृत्यू हा अपघात नसून हत्या होती. असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे उघड केले आहे. त्यांनी आसाम विधानसभेत सांगितले की झुबिन गर्गची हत्या झाली, ते अपघातात बळी पडलेला नाही. असा घृणास्पद गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. विरोधी पक्षाने झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
आसाम विधानसभेत गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, आसाम पोलिसांना त्यांच्या प्राथमिक तपासात खात्री पटली की हा सदोष मनुष्यवधाचा खटला नाही, तर पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून केलेला खून आहे. एका व्यक्तीने झुबिन गर्ग यांची हत्या केली आणि इतरांनी त्याला मदत केली. या प्रकरणात चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






