अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळाचा (Ram Mandir Inauguration) दिवस अगदी जवळ आला आहे. 22 तारखेच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राम भक्त आतुर झाले आहेत. त्यापूर्वी काल (दि.19) रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा (prabhu ram murti) फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी तो शेअर करत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. राजबिंडे रुप आणि स्मित हास्याने सर्वांवर मोहिनी केली. श्रीराम मूर्तीवरील भाव पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आता मात्र हा फोटो (prabhu ram first look) सोशल मीडियावर व्हायरल (prabhu ramViral photo) केल्याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे फोटो काल दूपारनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुवातीला संपूर्ण मूर्ती झाकलेले फोटो समोर आले. त्यानंतर फक्त डोळ्यावर पट्टी बांधलेल्या प्रभू रामांचे फोटो समोर आले. हे फोटो देखील व्हायरल झाल्यानंतर तिसरा फोटो समोर आला. या तिसऱ्या फोटोमध्ये डोळ्यावरील पट्टी देखील काढली होती. यामध्ये प्रभू रामांचे संपूर्ण दर्शन सर्वांना झाले. मूर्तीवरील स्मित हास्य व शांत भाव पाहून भाविक भारवले. मात्र आता या मूर्तीचे फोटोवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
याच फोटोवरुन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले, “प्राणप्रतिष्ठा पूर्ण होण्याच्या आधी प्रभू श्रीरांच्या डोळ्यांवरील पट्टी काढली जावू शकत नाही. मूर्तीमध्ये रामलल्लांचे डोळे दिसत असतील तर ते योग्य नाही. जिथे नवीन मूर्ती आहे तिथेच प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरु आहे. आता मूर्तीला कपड्यांनी झाकलेलं आहे. मूर्तीमध्ये डोळे उघडे दिसत आहेत, ते योग्य नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी नेत्र उघडले जाणार नाहीत. जर तेच छायाचित्र व्हायरल झालं असेल तर याची चौकशी केली जाईल.” अशी मागणी मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली. त्यामुळे आता व्हायरल फोटो मागे चौकशी होण्याची शक्यता आहे.