बागेश्वर धाम (Bageshwar Dham) नावाने प्रसिद्ध असेलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर आजकाल आपल्या चमत्कारिक शक्तीमुळे नेहमी वेगवेगल्या कारणाने चर्चेत असतात. तसेच त्यांनी केलेल्या वागग्रस्त वकत्यावरुनही ते कायम चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांनी एक विधान केलं असून ते चांगलच व्हायरल होत आहे.
[read_also content=”आता देवी सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यावर विचार सुरू, सर्वानुमते निर्णय घेण्याची विश्वस्त मंडळाची सूचना https://www.navarashtra.com/india/temple-comity-thinking-about-implementing-dress-code-in-devi-saptshringi-temple-nrps-405962.html”]
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद येथे त्यांचा कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या क्रायक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. आधी त्यांनी गुजरातच्या जनतेला वेडा म्हणत संबोधित केले. आता, अहमदाबादच्या वटवा येथील पुन्हा एक वक्तव चर्चेत आलं आहे.शिवपुराण कथेत धीरेंद्र शास्त्री यांनी गुजराताना पगलो केम छो म्हणत त्यांनी संबोधनाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांनी गुजरातला भक्तीभूमी म्हणत नतमस्तकही केले होते. त्याचवेळी त्यांनी भारतालाच नव्हे तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत विधान केलं आहे. आता या विधानाची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू आहे. या विधानावरुन आता बागेश्वर धाम यांना ट्रोल करण्यात येत आहे.
26 मे रोजी सुरतमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मी फक्त एकाच पक्षाचा आहे. ती पार्टी बजरंग बलीची आहे. गुजरातच्या जनतेसाठी ते म्हणाले होते की, गुजरातच्या जनतेवर विजय मिळवणे कठीण आहे. मी गुजरातच्या भूमीला नमन करतो. इथल्या लोकांची जगभरात पोहोच आहे. तुमच्यावर विजय मिळवणे कठीण आहे.