उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढणार? (फोटो- istockphoto)
लखनौ: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री तर केशव प्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री आहेत. आता उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असणारे केशव प्रसाद मौर्य यांच्या अडचि वाढण्याची शक्यता आहे.
भाजपमधील एका नेत्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यनाहकीय विरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून केशव प्रसाद मौर्य यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. हायकोर्टाने ही याचिका स्वीकार केली आहे. याचिकेतील आरोप खरे ठरल्यास केशव प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कदाचित त्यांना तुरुंगात जावे लागू शकते असे म्हटले जात आहे.
अलाहाबाद हायकोर्टाने केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधातील याचिका स्वीकार केली आहे. याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. खोट्या पदवीच्या आधारावर केशव प्रसाद मौर्य यांनी ५ निवडणूक लढवल्या आहेत असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. त्यांनी बनावट पदवीच्या आधारे कौशांबी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून पेट्रोल पंप मिळवला, असा आरोप करण्यात आला आहे.
भाजप नेते आणि आरटीआय अधिकाऱ्याने ही याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने याचिकेत तथ्य नसल्याने याचिका फेटाळून लावली होती. याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याने याचिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. तसेच याचिकाकर्त्याळा पुन्हा हायकोर्टात जाण्यास सांगितले. यानंतर पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका अलाहाबाद हायकोर्टाने स्वीकारली आहे.
केशव प्रसाद मौर्य यांच्यावर नक्की काय आरोप आहेत?
भाजप नेते आणि आरटीआय कार्यकर्त्याने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात काही आरोप करत अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद हायकोर्टने ही याचिका स्वीकारली आहे. ६ मे ला यावर सुनावणी होणार आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी २०१४ मध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांच्याकडे ‘बीए’ पदवी असल्याचे जाहीर केले होते, असा दावा आरटीआय कार्यकर्त्याने याचिकेत केला आहे. १९९७ मध्ये त्यांनी हिंदी साहित्य संमेलनातून बीए केल्याचे दाखवण्यात आले होते. उपमुख्यमंत्र्यांनी २००७ मध्ये प्रयागराजच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
केशव प्रसाद मौर्य यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी हिंदी साहित्य संमेलनातून १९८६ मध्ये प्रथमा पदवी, १९८८ मध्ये मध्यम पदवी आणि १९९८ मध्ये उत्तम पदवी मिळवल्याचे नमूद केले. काही राज्यांमध्ये, प्रथमा पदवी हायस्कूलच्या समतुल्य मानली जाते, मध्यम पदवी इंटरमिजिएटच्या समतुल्य मानली जाते आणि उत्तम पदवी पदवीच्या समतुल्य मानली जाते. हिंदी साहित्य संमेलन बीएची पदवी देत नाही. त्यामुळे शपथपत्रात दिलेली माहिती चुकीची आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.