नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा समाचार घेतला. महुआचे संसद सदस्यत्व राहणार की जाणार, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, महुआ मोईत्राबाबतचा अहवाल 12 वाजेनंतर सादर केला जाईल.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल. महुआ मोइत्राच्या हकालपट्टीसंबंधीच्या नीतिशास्त्र समितीच्या निर्णयाचा अहवाल लीक झाल्याच्या आरोपावरून त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समाचार घेतला.
निशिकांत दुबे म्हणाले, अधीर यांनी अहवाल लीक केल्याचे दिसते. लोकसभेतील काँग्रेस नेते आणि अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आचार समितीच्या कारवाईचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.