६००० दुर्घटना, ९००० प्रवाशांचा बळी; बोईंग विमानाच्या रक्तरंजित प्रवासाची इनसाईड स्टोरी, नक्की वाचा
आयुष्यात एकदातरी विमान प्रवास करावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ढगांच्या पलिकडून जगाला पाहण्याची अनुभूती देणारा प्रवास हवा हवासा वाटत असतो. हा प्रवास जसा सुखद अनुभव देणारा असतो तसाच थरार आणि काहीसा अभिमानास्पदही वाटत असतो. मात्र प्रत्येकाच्या स्वप्नातला हा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. आज घडलेल्या अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनकडे उड्डाण भरलेलं एअर इंडियाचं फ्लाइट AI-171 विमान टेकऑफनंतर काही मिनिटात कोसळलं. विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. मात्र स्वप्नातला प्रवास घडवणाऱ्या आणि एकेकाळी प्रगत तंत्रज्ञानाचं प्रतीक मानल्या गेलेल्या या कंपनीच्या विमानांनी गेल्या काही वर्षांत इतकी अपघातांची मालिका अनुभवली आहे की त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकीकडे आधुनिकतेचा आव आणणाऱ्या या विमानांनी हजारो प्रवाशांचा बळी घेतला आहे. दरम्यान बाईंगची विमाने कशासाठी ओळखली जातात? आणि या विमानांचा रक्तरजित प्रवास कधीपासून सुरू झाला, पाहूयात या रिपोर्टमधून…
Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर
बोईंग 787-8 ड्रीमलाइनर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज, दीर्घ पल्ल्याच्या आणि प्रवाशांना आरामदायक अनुभव देणारं विमान म्हणून प्रसिद्ध होते. मात्र प्रत्यक्ष नोंदी काही वेगळीचं सांगतात. याच वर्षाच्या सुरुवातीला “N819AN” क्रमांकाच्या ड्रीमलाइनरमध्ये केवळ २५ दिवसांतच हायड्रॉलिक लीकेज आणि फ्लॅप फेलियरसारख्या गंभीर तांत्रिक दोष असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती.
अहमदाबाद विमान दुर्घटना पहिलेच प्रकरण नाही. 2024 मध्ये दक्षिण कोरियात बोईंग 737-800 क्रॅश होऊन सुमारे 180 लोकांचा मृत्यू झाला. हे विमान 737 मॅक्सचे आधुनिक रूप होते. त्याआधी 2018 आणि 2019 मध्ये लायन एअर फ्लाइट 610 आणि इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट 302 या दोन अपघातांना जगाला हादरवून सोडलं. या दोन घटनांमध्ये अनुक्रमे 189 आणि 157 लोकांनी प्राण गमावले. त्या अपघातांनंतर 737 मॅक्स हे मॉडेल जगभरात ग्राउंड करण्यात आले आणि कंपनीला जवळपास 30 अब्ज डॉलरचा फटका बसला. 2023 मध्येही 737 मॅक्स उड्डाणाच्या दरम्यान दरवाजाचा प्लग सुटण्याची घटना घडली होती.
बोईंगचा पहिला अपघात
तारीख: 18 फेब्रुवारी 1936
विमान: Boeing 247
ठिकाण: Pittsburgh, USA
घटना: वीज आणि वादळामुळे विमान कोसळले.
मृत्यू: 9 जण ठार
बोईंगचे मोठे अपघात
1. 1956 – Boeing 377
इंजिन फेल्युअरमुळे पॅसिफिक महासागरात अपघात
50 हून अधिक मृत्यू
2. 1977 – Boeing 747, टेनेरिफ (स्पेन)
दोन 747 विमानांची रनवेवर टक्कर
583 मृत्यू – जगातील सर्वात मोठा विमान अपघात
3. 1985 – JAL 123 (Boeing 747SR), जपान
टेल स्ट्रक्चर फेल्युअरमुळे कोसळले
520 जण ठार – सर्वाधिक मृत्यू झालेला सिंगल विमान अपघात
4. 1996 – TWA फ्लाइट 800 (Boeing 747), USA
इंधन टाकीमध्ये स्फोट
230 जण ठार
5. 2001 – 9/11 हल्ले (Boeing 767 विमाने)
अमेरिकन एअरलाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्सची विमाने
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला
प्रत्येकी विमानात 150 प्रवासी मृत्युमुखी
6. 2010 – Boeing 737, मंगळूर (भारत)
रनवेवरून बाहेर गेल्यामुळे अपघात
158 मृत्यू
7. 2013 – Boeing 777 (Asiana फ्लाइट 214), सॅन फ्रान्सिस्को
चुकीच्या लँडिंगमुळे अपघात
3 जण ठार
8. 2018 – Boeing 737 MAX (Lion Air), इंडोनेशिया
MCAS सिस्टिम बिघाड
189 जण ठार
9. 2019 – Boeing 737 MAX (Ethiopian Airlines)
पुन्हा MCAS सिस्टिममुळे अपघात
157 जण ठार
सरकारी आकडेवारीनुसार, जगभरात बोईंगच्या विमानांशी संबंधित सुमारे 6,000 अपघात आणि तांत्रिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील 415 घटना प्राणघातक होत्या आणि एकूण मृतांचा आकडा 9,000 च्या वर गेला आहे. आत्ताही जगभरात सुमारे 4,000 पेक्षा अधिक Boeing 737-800 विमानं कार्यरत आहेत, विशेषतः आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत त्यांचा वापर अधिक आहे.
बोईंगचे माजी अभियंता आणि व्हिसलब्लोअर सॅम सालेहपौर यांनी न्यूयॉर्क टाइम्स व CNN ला दिलेल्या मुलाखतीत 777 आणि 787 मॉडेल्सच्या उत्पादनादरम्यान कंपनीने सुरक्षा नियमांवर डावलून शॉर्टकट्स घेतल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “हे विमान जसे-जसे जुने होतील, तसतशी त्यांच्यातील अपघातांची शक्यता वाढत जाईल.”
जगभरात लाखो प्रवासी बोईंगच्या विमानांवर विश्वास ठेवून प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांनी या विश्वासाला हादरा दिला आहे. केवळ तांत्रिक उणीवा नव्हे तर व्यवस्थात्मक हलगर्जीपणाही असल्याचं तज्ज्ञांच मत आहे. या पार्श्वभूमीवर, विमान वाहतूक कंपन्यांनी आणि सरकारांनी सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिक कठोर धोरणं राबवणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.