उत्पन्नावरील कर, किसान क्रेडिट कार्ड ते औषधं; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या २० घोषणा, जाणून घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प GYAN अर्थात गरीब, युवा, अन्नदाता, नारीशक्ती यांना समर्पीत असल्याचं सांगण्यात आलं. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्पन्नदरानुसार नवी करप्रणाली कशी असेल याचीही माहिती देण्यात आली. खूप मोठ्या घोषणा नसल्या तर करामध्ये सूट मध्यमवर्गाला दिलासा देणारी ठरली आहे. पाहूयात कोणते महत्त्वाच्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या दहा महत्त्वाच्या घोषणा केल्या.
१. २०२५-२६ मध्ये करदात्यांना दिलासा मिळणार आहे. १२ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांवर कोणताही कर नसल्याची घोषणा सीतारामन यांनी केली.
२. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
३. अर्थमंत्र्यांनी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना देखील जाहीर केली. यात १०० जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या कृषी योजनेमुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
४. येत्या ३ वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्रे स्थापन करण्याची सुविधा देण्यात येईल. यापैकी २०० केंद्रे याच आर्थिक वर्षामध्ये स्थापन केल्या जातील.
५. ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. पुढील पाच वर्षात यात राष्ट्रीय कौशल्य केंद्र उत्कृष्टता मागील योजनांवर आधारित ५ राष्ट्रीय कौशल्य केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात १० हजार जागा वाढवल्या जातील.
६. ५० पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहेत. वैद्यकीय पर्यटन आणि आरोग्य लाभांना प्रोत्साहन दिले जाईल. संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी २० हजार कोटी रुपये बजेट असणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
७. लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड दिले जाईल. पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील. पंतप्रधान स्वानिधी योजनेची कर्ज मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे.
८. स्टार्टअप्ससाठी देण्यात येणारे कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले असून हमी शुल्कातही कपात केली जाणार आहे. MSME कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले असून यात १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असणार आहे.
९. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर केले जाणार आहे, अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली.
१०. २०२५ मध्ये तब्बल ४० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे यावर्षामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे.
डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन – 6 वर्षांसाठी विशेष योजना
युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता – पुरवठा वाढवण्यासाठी नवे पाऊल
आसाममध्ये १२.७ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारणार
बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन
एमएसएमई वर्गीकरण नियमांत बदल
गुंतवणूक मर्यादा 2.5 पट वाढणार
उलाढाल मर्यादा दुप्पट होणार
तूर, उडीद, मसूर यांसाठी 6 वर्षांसाठी विशेष अभियान
केंद्रीय एजन्सी पुढील 4 वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करणार
स्टार्टअप आणि उद्योगांसाठी तरतूद
* स्टार्टअप्ससाठी ₹१०,००० कोटींची तरतूद
* एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत
* महिलांना स्टार्टअपसाठी ₹२ कोटींची मदत
* भारताला खेळण्यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठी विशेष योजना
* नाॅन-लेदर फुटवेअर उत्पादकांसाठी प्रोत्साहन योजना
शिक्षण आणि कौशल्य विकास
कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे
आयआयटी क्षमतावाढ प्रकल्प राबवणार
मेडिकल कॉलेजसाठी मोठी तरतूद
पुढील वर्षात १०,००० अतिरिक्त जागा उपलब्ध
पुढील ५ वर्षांत ७५,००० जागांची भर
शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्र उभारणार
₹५०० कोटींची विशेष तरतूद
२०० डे-केअर कॅन्सर केंद्रे उघडणार
नव्या योजनांसाठी ₹१० लाख कोटी गुंतवणूक
जल जीवन मिशन २०२८ पर्यंत वाढवण्यात आले
न्युक्लिअर एनर्जी मिशन
खासगी क्षेत्रासोबत भागीदारी
१०० गिगावॉट न्युक्लिअर एनर्जी निर्मितीचे लक्ष्य (२०४७ पर्यंत)
अणू क्षेत्रात संशोधन आणि विकाससाठी 20 हजार कोटींची तरतूद
स्वदेशी बनावटींनी तयार केलेल्या अणू भट्ट्यांसाठी वीस हजार कोटी
२०३३ पर्यंत अणुभट्ट्या कार्यरत होणार