सीडीएस आणि तीनही सैन्य प्रमुख राष्ट्रपतींच्या भेटीला (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची दाणादाण उडवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना संबोधित करताना पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. त्यातच आता एक महत्वाची घडामोड समोर येत आहे. सीडीएस आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्या भेटीला गेले आहेत.
सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख, अडमिरल दिनेश त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एपी सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांना माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. तसेच सशस्त्र दलांचे देखील अभिनंदन केले.
राष्ट्रपती भवनने केली पोस्ट
राष्ट्रपती भवनाने सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले, “सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख, अडमिरल दिनेश त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एपी सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांची भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.
General Anil Chauhan, Chief of Defence Staff, along with General Upendra Dwivedi, Chief of the Army Staff, Air Chief Marshal A. P. Singh, Chief of the Air Staff, and Admiral Dinesh K. Tripathi, Chief of the Naval Staff, called on President Droupadi Murmu and briefed her about… pic.twitter.com/ZU3GcK5Vux
— President of India (@rashtrapatibhvn) May 14, 2025
तर आम्ही घरात घुसून मारणार; पंतप्रधान मोदी
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहालगाम हल्ल्याचा बदल घेतला आहे. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधन केले. तर अचानक पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले.
PM Narendra Modi: “… तर आम्ही घरात घुसून मारणार; आदमपूर एअरबेसवरून मोदींनी पाकिस्तानला सुनावले
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले.”
भारताच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ
भारत-पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षामुळे पाकिस्तानची पुरती दाणादाण उडाली. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर देत त्यांची जागा दाखवून दिली. विशेष म्हणजे या युद्धसदृश परिस्थितीमुळे पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगालाही भारताची ताकद दिसून आली. भारतीय लष्करी शस्त्रांची ताकद पाहून शत्रू देशालाही घाम फुटला. सुदर्शन एस ४००, ब्रह्मोसपासून ते राफेलपर्यंत, भारताच्या संरक्षण यंत्रणेने आपली ताकद दाखवून दिली आहे.