फोटो सौजन्य: X.com
कारमधील स्फोट इतका भीषण होता की जवळ उभे असलेल्या लोकांचे शरीर, वाहनांसह काही मीटर अंतरावर विखुरले गेले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तर पोलिसांनी मृतदेहांचे अवशेष पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवले. माहितीनुसार, घटनास्थळी 5 ते 6 वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. हा स्फोट इको व्हॅनमध्ये झाल्याचा संशय वर्तविला जात आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही बाजूला पाहिले तेव्हा आम्हाला तिथे एक मानवी हात पडलेला दिसला आणि जेव्हा पुढे पाहिले तेव्हा आम्हाला तिथे चक्क एक फुफ्फुस पडलेला दिसला. पुढे प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही इतके घाबरलो होतो की आम्ही पुढे जाऊच शकलो नाही.”
हा धक्कादायक ‘धमाका’ लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झाला. स्फोट इतका जोरदार होता की यामुळे काही इतर वाहनांनाही आग लागली. घटनेनंतर परिसरात मोठी भीती पसरली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण परिसर सील केला असून सर्वसामान्य वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी सुमारे 15 दमकल गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत. तसेच मुंबईत अशा घटना घडू नये म्हणून मुंबईची सुरक्षा यंत्रणा अजूनच जास्त सुरक्षित केली जाण्याची शक्यता आहे.






