भाजपच्या वाटेवर असलेल्या कमलनाथ यांच्यासाठी भाजपचे दार बंद: बड्या नेत्याचा दावा

भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेश होण्याचे वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे  1984 च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना भाजपमध्ये कुठलेही स्थान नाही, अशी पोस्ट तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्वीटरवर केली आहे. त्यामुळे आता कमलनाथ हे भाजपनमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्येच राहणार याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.

    दिल्ली :  लोकसभा निवडणूकीमुळे अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चा रंगल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ (Nakul Nath) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे काँग्रेस समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेश होण्याचे वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे  1984 च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना भाजपमध्ये कुठलेही स्थान नाही, अशी पोस्ट तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्वीटरवर केली आहे. त्यामुळे आता कमलनाथ हे भाजपनमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्येच राहणार याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की.,कमलनाथ हे 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी आहेत. त्याच्याविरोधात अनेक साक्षीदार आहेत. मी आठ दिवस उपोषण केल्यानंतर कमलनाथ यांच्याविरोधात एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली. रकाब गंज गुरुद्वारा जाळण्यामागची व्यक्ती तीच आहे, जी ९ वे गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या स्मरणार्थ बांधली गेली होती. कमलनाथ यांना भाजपमध्ये स्थान नाही आणि मी माझ्या पोस्ट स्पष्ट केले आहे असे बग्गा यांनी सांगितलं.

    मी वरिष्ठ नेत्यांशी बोललो असून त्यांनी भाजपमध्ये कमलनाथ यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचे सांगितले आहे. मी नेहमीच कमलनाथ यांच्या विरोधात आहे आणि त्यांचा मुलगा नकुल यांच्या भाजप प्रवेशाला माझा आक्षेप नाही. बग्गा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत (कमलनाथ यांचे भाजपमध्ये येणे) कधीही शक्य होणार नाही, मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो. असा दावा भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणामध्ये आता नवीन काय समीकरण जुळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.